[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
WhatsApp HD Photo Feature : लोकप्रिय मॅसेजिंग शेअरिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येतं. आतादेखील व्हॉट्सअॅपने असं एक नवीन फिचर लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅपवर फोटो शेअरिंग सुधारण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर जोडले आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्स आपले HD फोटो शेअर करू शकणार आहेत. मेटा चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये ही माहिती दिली आहे. आतापर्यंत अॅपमध्ये कॉम्प्रेस केलेला फोटो शेअर केला जात होता, परंतु आता तुम्ही त्याची क्वालिटी बदलू शकता. हे नवीन फिचर टप्प्याटप्प्याने सादर केलं जाणार आहे. यूजर्स लवकरच या फिचरचा लाभ घेऊ शकतील.
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला फोटो शेअर करताना वर दाखवलेल्या HD बटणावर क्लिक करायचं आहे. अनेकदा यामध्ये बाय डिफॉल्ट फोटो कॉम्प्रेस केला जाईल. मात्र, तुम्ही HD बटणावर क्लिक केल्यावर फोटोची क्वालिटी आणखी चांगली दिसेल.
जेव्हा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीण किंवा अन्य व्यक्तीबरोबर HD फोटो शेअर करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्या फोटोद्वारेच त्याची माहिती मिळेल. फोटोच्या खाली एक HD लोगो दिसेल. कंपनीने सांगितले की, लवकरच लोकांना एचडी व्हिडीओचा पर्यायही मिळेल. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे HD मोडमध्ये तुमचं नेट नॉर्मल रेंजपेक्षा अधिक जाईल. त्यामुळे जर तुम्हाला हे नवीन फिचर नको हवं असेल तर तुम्ही एचडी मोड ऑफही करू शकता.
असे HD फोटो पाठवा
सर्वात आधी तुम्हाला ज्या व्यक्तीला HD फोटो पाठवायचा आहे तो चॅट बॉक्स ओपन करा. यानंतर, मेसेज बारच्या बाजूला असलेल्या प्लस आयकॉनवर टॅप करा आणि नंतर फोटो आणि व्हिडीओ लायब्ररी ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला जो फोटो पाठवायचा आहे तो निवडा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर HD चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि फोटो पाठवा.
अलीकडेच कंपनीने शॉर्ट व्हिडीओ फीचर देखील सादर केले आहे. या फिचरच्या मदतीने, तुम्ही चॅटमध्येच समोरच्या व्यक्तीला छोटे व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवू शकता. जसे तुम्ही ऑडिओ मेसेज पाठवता तसाच आता व्हिडीओचाही पर्याय लवकरच येणार आहे. शॉर्ट व्हिडीओ फीचर अंतर्गत, तुम्ही 60 सेकंदांचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Online Gaming : गेमिंग कंपन्यांकडून हजारो कोटीचा गंडा! कर चुकवेगिरी आणि क्रिप्टोच्या माध्यमातून हजारो कोटी देशाबाहेर
[ad_2]