GT vs CSK Qualifier Won By Chennai Super Kings And Enters Into IPL 2023 Final ;

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : काही झालं तरी चेन्नई सुपर किंग्सचा नाद करायचा नाही, हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. धोनीने टॉस गमावला होता, पण सामना जिंकण्यासाठी काय लागतं हे त्याला चांगलेच माहिती होते. ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजी डगमगली आणि चेन्नईने विजय साकारला. या विजयासह चेन्नईच्या संघाने आता IPL Finals 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.गुजरातच्या संघापुढे यावेळी चेन्नईच्या १७३ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करता आली नाही. कारम गुजरातचा शइभमन गिल वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. गिलने यावेळी ४२ धावांची खेळी साकारली. पण बाकीचे फलंदाज मात्र अपयशी ठरले. चेन्नईकडून यावेळी रवींद्र जडेजाने भेदक मारा करत ४ षटकांत फक्त १८ धावा दिल्या आणि दोन बळी मिळवले. जडेजाला यावेळी महेश तीक्ष्णा आणि दीपक चहर यांनी

चेन्नईला यावेळी धमाकेदार सुरुवात करून दिली ती सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या दोघांनी. यावेळी ऋतुराजला दुसऱ्याच षटकात जीवदान मिळाले. गुजरातच्या दुसऱ्याच षटकात दर्शन नळकांडेने विकेट मिळवली होती. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चेन्नईचा ऋतुराज गायकवाड हा फलंदाजी करत होता. ऋतुराज या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण त्याचे टायमिंग चुकले आणि त्याला मोठा फटका मारता आला नाही. ऋतुराजचा हा चेंडू हवेत उडाला. गिल हा झेल पकडण्यासाठी पुढे सरसावला. गिलने यावेळी कोणतीही चूक केली नाही आणि त्याने हा झेल पकडला. त्यामुळे गुजरातचा संघ हा सेलिब्रेशन करत होता. पण त्याचवेळी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आली. पंचांनी यावेळी ऋतुराजला बाद दिले नाही, कारण ज्यावेळी दर्शनने चेंडू टाकला तेव्हा त्याचा पाय लाइनच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल दिला. त्यामुळे ऋतुराज बाद होऊ शकला नाही. या जीवदानाचा फायदा यावेळी ऋतुराजने चांगलाच उचलला. कारण ऋतुराजने यावेळी अर्धशतक झळकावले, त्याचे गुजरातविरुद्धचे हे सलग चौथे अर्धशतक ठरले. ऋतुराजने यावेळी ४४ चेंडूंत ६० धावांची दमदार खेळी साकारली, कॉनवेनेही यावेळी ४० धावांची खेळी साकारली.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

या दोघांच्या दमदार खेळींच्या जोरावर चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा करता आल्या आणि विजयाचा पाया रचता आला.

[ad_2]

Related posts