Pakistan Bus Fire: पाकिस्तानमध्ये बसचा भीषण अपघात, आगीत १८ प्रवाशी होरपळले, १६ जखमी – pakistan news 18 burn alive 16 injured as passenger bus catches fire after collision in punjab

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पंजाब: पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झालेल्या या अपघातानंतर संपूर्ण देशाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील बुलढाणा समृद्धी मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेची आठवण करुन दिली आहे. कराचीहून इस्लामाबादला जाणाऱ्या बसला आग लागल्याने झालल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघात झालेल्या बसमध्ये ४० हून अधिक लोक प्रवास करत होते, असे सांगण्यात येत आहे. जळत्या बसचे चित्र समोर आले असून, त्यात भीषण आग बाहेर पडताना दिसत आहे. या अपघातात १६ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली ती बस राजधानी इस्लामाबादहून कराचीला जात होती. दुसरीकडे, मदत आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्या टीमच्या म्हणण्यानुसार, बस पिंडी भटि्टयाजवळ पोहोचली तेव्हा हा हृदयद्रावक अपघात झाला. येथे पोहोचताच बसमध्ये मोठी आग लागली. बसमधून उंचच उंच ज्वाळा उठत होत्या. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण बस जळून कोळसा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आधी बसला अपघात झाला. त्यानंतर बसमध्ये मोठी आग लागली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उर्वरित जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी तातडीने कारवाई करत गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.

पाय ट्रेनच्या चाकाखाली आला, पंजा रक्तबंबाळ, तरीही ‘आई ठीक आहे ना’ विचारत राहिली
दरम्यान, अपघाताचे कारण सांगताना पोलिसांनी सांगितले की, ‘बस भरधाव वेगाने जात होती, तेव्हा तिची पिक-अप व्हॅनला धडक बसली. त्या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल भरले होते. यामुळेच धडक दिल्यानंतर बसमध्ये मोठी आग लागली. हा अपघात इतका भीषण होता की अनेकांचा जागीच मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एका ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू, दुसरा ड्रायव्हर सुदैवाने वाचला

[ad_2]

Related posts