[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
KL Rahul & Shreyas Iyer : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. दुखापतीनंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघात कमबॅक केलेय. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त होते. बेंगळुरुच्या एनसीएमध्ये या दोघांनी दुखापतीनंतर फिटनेस टेस्ट यशस्वी पार केली आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने आशिया चषकासाठी आज भारतीय संघासाठी निवड केली. यामध्ये राहुल आणि अय्यर यांना संधी दिली आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही आशिया चषकात स्थान देण्यात आले आहे. राहुल याला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. तर त्याआधी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. या दोन्ही खेळाडूंचे कमबॅक झाल्यामुळे भारतीय संघाचा मध्यक्रम अधिक मजबूत झालाय. सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरु आहे.
अय्यरचे पाच महिन्यानंतर कमबॅक
श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी झाली होती. त्याचवेळी दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएल 2023 च्या मोसमात खेळू शकला नाही. श्रेयस अय्यर तब्बल पाच महिन्यांनी मैदानात परतणार आहे. तर केएल राहुल तब्बल चार महिन्यांनंतर मैदानात परतणार आहे. विश्वचषकाआधी या दोन्ही फलंदाजांना कमबॅक करण्याची संधी असेल.
बुमराह-प्रसिद्ध यांचेही कमबॅक-
जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा सध्या आयर्लंड दौऱ्यात भेदक मारा करत आहेत. या दोन्ही गोलंदाजांना आशिया चषकात संधी दिली आहे. बुमराहची निवड निश्चित मानली जात होती. प्रसिद्ध कृष्णा याची निवड करुन सर्वांनाच धक्का दिलाय. विश्वचषकासाठी प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर यांच्यामध्ये स्पर्धा रंगणार आहे. दोन्हीपैकी एकाच गोलंदाजाला संधी मिळणार आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि बुमराह यांनी मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात कमबॅक केलेय.
आशिया चषकासाठी भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)
30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
[ad_2]