[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भाताचे सेवन करा कमी
तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नसेल आणि तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डाएटमधून व्हाईट फूड्सपैकी एक भात हा पदार्थ खाणे कमी करावे. तुम्हाला भात खायला आवडत असेल तर हळूहळू याचे सेवन कमी करा.
हेल्थलाईनने दिलेल्या अहवालानुसार, फायबर आणि प्रथिनांच्या अनुपस्थितीमुळे पांढरे तांदूळ जास्त प्रमाणात खाणे हे वजन वाढण्यास किंवा रक्तातील साखरेचे असंतुलन करण्यास कारणीभूत ठरू शकते.
काय खावे – पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसचा आहारात समावेश करून घ्यावा. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात, त्यामुळे मूलत: त्याच वनस्पतीपासून तुम्हाला अधिक फायदा मिळतो.
सफेद ब्रेड
बरेचदा सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड खाण्याला अधिक प्राधान्य देतात. मात्र त्यातही सफेद ब्रेड अधिक प्रमाणात खाल्ला जातो. सफेद ब्रेडच्या सेवनाने बेली फॅट त्वरीत वाढते आणि त्यामुळेच तुमच्या आहारातून सफेद ब्रेड तुम्ही काढून टाकणे अधिक गरजेचे आहे. सफेद ब्रेड शरीरातील हाय कोलस्ट्रॉलचे कारण ठरते.
काय खावे – या ब्रेडऐवजी होल ग्रेन ब्रेड खावा. यातील सुधारित पौष्टिकता आणि वाढलेली फायबर सामग्रीदेखील तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रतिसादावर अंकुश ठेवण्यास आणि कॅलरी नियंत्रणात राहण्यास मदत करते.
(वाचा – जय आणि माहीची मुलगी तारा भानुशाली रूग्णालयात दाखल, Influenza A ची लागण काय आहे हा आजार)
साखर
नो व्हाईट फूड्स डाएटमध्ये पांढरी साखर आहारातून काढून टाकणे हे महत्त्वाचे आहे. आहारामध्ये ब्राऊन शुगर, मध, टर्बिनाडो साखर, मॅपल सिरप याचा समावेश केला जातो. मात्र याचाही सहसा उपयोग करू नये. साखर प्रामुख्याने साध्या कर्बोदकांद्वारे बनलेले असल्यामुळे, त्वरीत रक्तप्रवाहात शोषली जाते आणि भरपूर कॅलरीज असल्यामुळे जाडी वाढणे अथवा डायबिटीससारख्या रोगांना आमंत्रण मिळते.
काय खावे – साखरेऐवजी तुम्ही फळांचा आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता. फळांमध्ये नैसर्सिक साखर असून त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात जे हानिकारक प्रभाव कमी करण्यास मदत करतात.
(वाचा – चंद्र नमस्कार माहीत आहेत का? सूर्यनमस्काराप्रमाणेच होतात आरोग्याला अफलातून फायदे)
मिठाचे सेवन
बहुतेक लोकांना जेवणातील पांढरे मीठ माहीत आहे. परंतु ते गुलाबी, निळे आणि काळे यांसारख्या इतर रंगांमध्ये देखील उपलब्ध असते. मीठ आरोग्यासाठी आवश्यक असले तरी,जंक फूडमध्ये याचा अतीव प्रमाणात वापर केला जातो. जास्त मिठाचे सेवन हृदयरोग, स्ट्रोक, लठ्ठपणा आणि किडनीच्या आजाराच्या वाढीव जोखमीसह विविध त्रासांना आमंत्रण देते. त्यामुळे मिठाचे सेवन कमी करावे.
काय खावे – मिठाऐवजी तुम्ही औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा आहारात समावेश करून घ्यावा. हे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे महत्त्वाचे स्त्रोत असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यात आणि रक्तातील साखरेचे नियमन करण्यात भूमिका बजावू शकतात.
(वाचा – हिरड्यांच्या समस्यांनी हैराण आहात का? ६ घरगुती उपाय जे ठरतील रामबाण इलाज)
पांढरा बटाटा
आपल्याकडे बटाटा ही अशी भाजी आहे जी दर एक दिवसआड घरांमध्ये शिजते. इतकंच नाही अनेक भाज्यांमध्ये मिक्स करून बटाटा भाजी बनवली जाते. मात्र पांढरा बटाटा सतत खाल्ल्याने वजन वाढ होते आणि त्यामुळे बटाट्याचे सेवन कमी करावे. जेव्हा पांढरे बटाटे कमी पौष्टिक पद्धतीने तयार केले जातात, उदाहरणार्थ ग्रेव्हीसारख्या खारट, उच्च कॅलरी टॉपिंग्जसह तळणे किंवा सर्व्ह करणे, ते वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.
काय खावे – बटाटा खाण्यापेक्षा विविध भाज्यांचा आहारामध्ये समावेश करून घ्यावा. हिरवा, नारिंगी, पिवळा, लाल, जांभळा आणि पांढरा यासह विविध रंगांच्या भाज्या खाल्ल्याने हृदयविकार आणि कोलन कॅन्सर यांसारख्या दीर्घकालीन स्थितीचा धोका कमी होतो.
कोणते सफेद पदार्थ ठरतात हेल्दी
सर्वच पांढरे अर्थात सफेद पदार्थ हे शरीराला हानिकारक ठरत नाहीत. तर काही पदार्थ हे शरीराला अत्यंत चांगले आणि आरोग्यदायीदेखील ठरतात. यापैकी सफेद कांदा, लसूण, मशरूम्स, अंडी, दूध, दही, व्हाईट फिश, काजू यासारख्या आणि अनेक पदार्थांचा समावेश आहे.
वर नमूद करण्यात आलेले पदार्थ तुमच्या शरीरातील चरबी वाढवतात. त्यामुळे या पदार्थांपासून चार हात लांब राहिल्यास, तुमचे वजन त्वरीत कमी होण्यास मदत मिळते.
[ad_2]