[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Success story : प्रत्येकाला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो. कोणतीही मोठी अडचण आली तरी खचून न जाता सामना करणाऱ्याला यश मिळतेच. अखेरपर्यंत लढत राहात अडचणींवर मात करणारे आयुष्याच्या नव्या उंचीपर्यंत पोहचतात अन् अनेकांसाठी प्रेणादायक आणि आदर्श ठरतात. सांगलीच्या आशिष पवार याचा संघर्ष सध्या अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतोय. आशिष पवार याने क्रोहन आजारावर (Crohn’s disease) मात करत यशाचे नवे आयाम गाठलेय. सांगलीचा आशिष पवार ऑट्रिया येथे होणाऱ्या वर्ल्ड युनायटेड एमेच्योर पॉवरलिफ्टिंग (WUAP) चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
43 वर्षीय आशिष पवार याचा संघर्ष प्रचंड आहे. क्रोहन (Crohn’s disease) या दुर्मिळ आजारावर त्याने मात केली. सात वर्षानंतर मात करत आशिष पवार हा 43 वर्षाच्या जिम ट्रेनर 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान ऑट्रिया येथे होणाऱ्या वर्ल्ड युनायटेड एमेच्योर पॉवरलिफ्टिंग (WUAP) चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आशिष पवार यांना 2012 मध्ये क्रोहन (Crohn’s disease)हा आजार झाल्याचे निदर्शनास आले. गेले सात वर्षे आजाराशी तो लढत होते, तर तीन वर्ष पूर्णपणे बेडवर पडून उपचार घेत होते. यादरम्यान त्याचे अनेक सर्जरी झाल्या. मात्र जिम ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या पवारला काहीतरी नवीन शिकायची आवड होती. म्हणून पवार यांनी पावर लिफ्टिंग शिकण्यास सुरुवात केली. क्रोहन (Crohn’s disease) या आजारावर मात करत आता थेट वर्ल्ड युनायटेड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ते प्रतिनिधित्व करणार आहेत.
पवार जेव्हा आजारपणातून घरी आले तेव्हा चालायची सुद्धा ताकद नव्हती. पण आई-बाबांच्या मदतीने त्यांनी हळूहळू चालायला सुरुवात केली. आता तो दिवसातून अडीच तास कठोर प्रशिक्षण घेतो. आगामी लढाईसाठी आठवड्यातून एक दिवस, तो क्रोहन रोगाशी (Crohn’s disease) आणखी एक लढाई लढत आहे. आता त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला कोलोस्टोमी बॅग जोडलेली आहे, जी मूत्र गोळा करते. पिशवी लीक होण्याची शक्यता असते, तथापि, तो याचा त्याच्या प्रशिक्षणावर परिणाम होऊ देत नाही.
आशिष पवार यांचे प्रशिक्षक तुषार दरेकर जे महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग आणि फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याची बराच मदत केली. पवार यांचे आई-वडिल सेवेनिवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळाली रक्कम आपल्या मुलाचा आजारपणत संपवली. आता तो आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धामध्ये भाग घेणार आहे, हे त्यांच्या आई-बाबांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं माहिती त्यांच्या आई अनिता पवार यांनी सांगितले. अनिता पवार यांनी सांगितलं की, या आजारादरम्यान त्यांचे मित्र मंडळी, नातेवाईक व बऱ्याच संस्थांनी त्यांना मदत केली. त्यामुळे आशिष आज पायावर उभा आहे.
आशिष पवार काय म्हणाले ?
प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असते आणि त्यावर आपल्याला काम करायचं असतं. कुठल्याही व्यक्तींनी हार ना मानता जिद्द ठेवून काहीतरी करण्याची इच्छा ठेवावी. संयम माणसाला यश मिळून देतो. सुरुवातीला मी जेव्हा घरी आलो, तेव्हा मला एक पाऊल सुद्धा चालता येत नव्हतं. मी आई-बाबांच्या मदतीने चालायला लागलो. माझ्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द होती, म्हणून मी राहत असलेल्या चार मालाच्या बिल्डिंगचे जिने उतरून चढू लागलो. त्यानंतर मी घरी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. सुरुवातीला मला खूप त्रास झाला. आतापर्यंत मी महाराष्ट्र राज्यात व देशात विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अजूनपर्यंत आठ ब्राऊन गोल्ड व सिल्वर मेडल जिंकले आहेत, असे आशिष पवार यांनी सांगितले.
[ad_2]