Instagram Threads Web Version Is Live Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Threads Web Version is Live : X म्हणजेच ट्विटरला मागे सोडण्यासाठी मेटाने थ्रेड्सचं (Threads) अॅप सुरू केले. अनेक लोकांना हे अॅप मोठ्या प्रमाणात आवडल्याने आता याच्या यूजर्सची संख्या देखील मोठी आहे. मेटा नेहमी विविध अपडेट आपल्या यूजर्सकरता आणत असते. आता असेच एक नवीन अपडेट मेटाने थ्रेड्सकरता लागू केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, थ्रेड्सचं वेब व्हर्जन (इन्स्टाग्रामचं थ्रेड्स वेब व्हर्जन) आणण्यावर काम करत आहे. हे काम आता पूर्ण झाले असून तु्म्ही आता वेबच्या मदतीने मेटाने थ्रेड्स ओपन करू शकता. याचाच अर्थ थ्रेड्स वापरण्याकरता वेब व्हर्जन सुरू झाले आहे. या वेब व्हर्जनमुळे यूजर्स थेट पोस्ट करू शकतील, त्यांचे फीड पाहू शकतील आणि डेस्कटॉपवरून पोस्टशी संवाद साधू शकतील.

थ्रेड्सचं (Threads) चे वेब व्हर्जन चालवण्याकरता तुम्हाला गूगलवर www.threads.net टाईप करावे लागेल. गूगल व्यतिरिक्त हे MacOS वर देखील ही Website ओपन होऊ शकते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मेटा लवकरच या विषयावर लोकांना अपडेट करेल. 

युजर्स परत आणण्यासाठी कंपनीचे मोठे प्रयत्न

मेटा थ्रेड्सचं (Threads) वर यूजर्सला परत आणण्याकरता कंपनी मोठे प्रयत्न करत आहे. त्याकरता  शक्य तेवढे अपडेट्स देखील आणत आहे. आता वेब व्हर्जनद्वारे देखील, मेटा लोकांना अॅपवर परत आणू इच्छित आहे. तथापि, मेटाच्या वेब आवृत्तीमध्ये अद्याप बरेच काही येणे बाकी आहे. सध्या अॅपमध्ये जास्त वैशिष्ट्ये नाहीत. यामध्ये तुम्ही लाइट आणि डार्क मोडमध्ये स्विच करू शकता. वेब व्हर्जनमध्ये तुम्हाला अॅपसारखाच एक इंटरफेस मिळेल, ज्यामध्ये फीड, सर्च, पोस्ट, लाईक आणि प्रोफाइलचा पर्याय देण्यात आला आहे.

कशा प्रकारे लाॅगिन करावे

– सर्वात पहिले Google वर जा आणि www.threads.net  असे टाका.

– त्यानंतर तुमचे Instagram चे डिटेल्स त्यात भरा. जसे की, यूजरनेम आणि पासवर्ड

– असे केल्यावर तुमच्या फोन नंबरवर एक OTP येईल तो भरा. असे सगळे केल्यास तुमचे थ्रेड्स खाते उघडले जाईल.

एक्स (ट्विटर) अडचणीत येण्याची शक्यता

थ्रेड्सचं वेब व्हर्जन आल्यानंतर ट्विटरचा त्रास वाढला आहे. कारण आता यूजर्स ट्विटरप्रमाणे वेबवरही पोस्ट करू शकणार आहेत. TweetDeck ला पर्याय म्हणून हे वेब व्हर्जन सुरु करण्यात आलं आहे. मेटाने जुलै महिन्यात थ्रेड्स अॅप आणले होते. हे अॅप लॉन्च झाल्यापासून पाच दिवसांच्या आत, प्लॅटफॉर्मने 100 मिलियन साईन-अपचा आकडा गाठला होता. पण, त्याची लोकप्रियताही फार लवकर घसरली. 10 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, थ्रेड्स अॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनवरील दैनिक अॅक्टिव्ह यूजर्स केवळ एका महिन्यात 49.3 मिलियनहून 10.3 मिलियनपर्यंत कमी झाले.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Samsung : Samsung Galaxy S23 FE पुढच्या महिन्यात होणार लाँच, दमदार आहेत फिचर्स जाणून घ्या सविस्तर

 

[ad_2]

Related posts