R Praggnanandhaa ​Life Story; मुर्ती लहान कीर्ती महान… कोण आहे हा प्रज्ञानंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती फक्त एकाच क्लिकवर…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​आईची कृपा…

​आईची कृपा...

एक स्त्री घराला पुढे नेते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रज्ञानंदची आई नागलक्ष्मी. मुलगी वैशाली आणि मुलगा प्रज्ञानंदला ग्रँडमास्टर बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एका मुलाखतीत नागलक्ष्मी म्हणाल्या, ‘प्रज्ञानंद जेव्हा खेळत असतो, तेव्हा माझ्या हृदयाचे स्पंदन तुम्हाला स्पष्टपण ऐकू येतील. तो खेळत असताना मी कधीच त्याच्या डोळ्यात बघत नाही.’ विशेष म्हणजे त्यांना बुद्धिबळ हा खेळ अद्यापही पूर्णपणे कळत नाही, पण तरीही त्या त्याला पाठिंबा देत असतात.

​​प्रज्ञानंदचा सराव​

​​प्रज्ञानंदचा सराव​

प्रज्ञानंद सुरुवातीला सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत बुद्धिबळाच्या प्रशिक्षणासाठी जात होता. यानंतर घरी आल्यावर तो आईसह होमवर्क पूर्ण करायचा. दोन्ही मुले लहानपणी खूप वेळ टीव्ही बघायचे. त्यांना टीव्हीची सवय लागू नये, म्हणून बुद्धिबळ क्लासेसला घातले. बहिणीमुळे प्रज्ञानंदला बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याने जेव्हा बुद्धिबळाला सुरुवात केली, तेव्हा वैशालीचा लहान भाऊ असाच उल्लेख बातम्यांमध्ये असायचा. त्यामुळे अशा प्रकारे प्रज्ञानंद हा बुद्धिबळ खेळायला लागला.

​​परदेशातही घरचे जेवण

​​परदेशातही घरचे जेवण

परदेशात भारतीय पद्धतीने आणि खास म्हणजे दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण मिळणे थोडे कठीण समजले जाते. पण परदेशातही प्रज्ञानंदला घरचे जेवण मिळत होते. प्रज्ञानंद आणि त्याची बहीण वैशालीला घरचे जेवण मिळावे, म्हणून त्यांची आई सोबत एक इंडक्शन स्टोव्ह आणि दोन स्टीलची भांडी सोबत ठेवायच्या. यात ते रस्सम आणि भात तयार करून मुलांना खाऊ घालायच्या. अगदी बुडापेस्टमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपपर्यंत हा शिरस्ता कायम आहे.

भारतीय बुद्धिबळात अव्वल ठरतील

भारतीय बुद्धिबळात अव्वल ठरतील

” भारताचे नवोदित बुद्धिबळपटू अजून २० वर्षांचेही झालेले नाही. त्यांचे एलो मानांकन २७०० पेक्षा जास्त आहे. हे सहजासहजी घडत नाही. ही नक्कीच खास कामगिरी आहे. ही नक्कीच सुवर्ण काळ आहे. ते नक्कीच भारतीय बुद्धिबळास जगात अव्वल ठेवतील. हे नवोदित आगामी दहा वर्षे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील, सहकारी असतील, तसेच मित्रही असतील,” असे यापूर्वी जगभरात बुद्धिबळात भारताचे नाव मोठे करणाऱ्या विश्वनाथन आनंद यांनी सांगितले.

वर्ल्ड कप हरला, पण जग मात्र जिंकले….

वर्ल्ड कप हरला, पण जग मात्र जिंकले....

भारताच्या १८ वर्षांच्या प्रज्ञानंदने वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन दिवसांमध्ये नेत्रदीपक खेळ केला. त्याने कार्लसनला चांगलेच धारेवर धरले होते.. त्यामुळे प्रज्ञानंद वर्ल्ड कप जिंकेल, असे सर्वांना वाटत होते. पण त्याला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. पण जगभरातील चाहत्यांची मनं मात्र त्याने यावेळी नक्कीच जिंकली आहेत. त्यामुळे त्याने वर्ल्ड कप जिंकला नसला तरी जग जिंकले आहे, अशी चर्चा क्रडी विश्वात सुरु झाली आहे.

[ad_2]

Related posts