X Premium New Features X Paid Users Can Now Post 2hr Of 1080p Videos And 3hr Of 720p Videos Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

X Premium New Features : गेल्या काही दिवसात ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. एलॉन मस्कने (Elon Musk) Twitter विकत घेतल्यापासून युझर्ससाठी अनेक नवीन फीचर आणले आहेत. आता परत एकदा Twitter मध्ये मोठा बदल होणार आहे. X (पूर्वीचे ट्विटर) यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. एलोन मस्क यांनी पेड यूजर्ससाठी आणखी एक नवीन वैशिष्ट्य दिले आहे. पेड यूजर्स आता X वर 3 तासांपर्यंतचे मोठे व्हिडीओ अपलोड करू शकतात. यूजर्स 1080p मध्ये 2 तासांपर्यंत आणि 720p मध्ये 3 तासांपर्यंत व्हिडीओ पोस्ट करू शकतात. याशिवाय यूजर्स आपल्या टाईमलाईनमध्ये येणारे व्हिडीओ गॅलरीमध्ये सेव्हदेखील करू शकतात. यासाठी त्यांना डाऊनलोडचा पर्याय मिळेल. जर पेड यूजर्सना असे वाटत असेल की, त्यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ कोणीही डाऊनलोड करू शकत नाही, तर यासाठी त्यांना व्हिडीओचा डाऊनलोड पर्याय डिसेबल किंवा अनेबल करण्याचा पर्याय असेल.

टीव्हीवर लांबलचक व्हिडीओही पाहता येतील

याशिवाय एलॉन मस्क यांनी सशुल्क यूजर्सना एअरप्लेची सुविधा दिली आहे. याअंतर्गत यूजर्स स्मार्ट टीव्हीमध्ये व्हिडीओही प्ले करू शकतात. हे फीचर लांबलचक व्हिडीओ पाहण्यासाठी फायदेशीर आहे. X प्रीमियम यूजर्सना लोकप्रिय व्हिडीओंसाठी पिक्चर-इन-पिक्चर आणि ऑटो कॅप्शनसाठी समर्थन देखील मिळेल. याबरोबरच लाईव्हची व्हिडीओ क्वालिटीही यापूर्वी करण्यात आली आहे. मस्क यांनी अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी इमर्सिव्ह व्हिडीओ प्लेअरचे समर्थन केले आहे.

एलॉन मस्क यांनी पत्रकारांसाठी ही माहिती दिली  

मंगळवारी एलॉन मस्क यांनी X वर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी पत्रकारांना त्यांचे लेख थेट X वर लिहिण्यास सांगितले. जेणेकरून ते अधिक पैसे कमवू शकतील. त्यांनी लिहिले की येथे पत्रकार कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे लिहू शकतात. जुलैच्या सुरुवातीस, एलॉन मस्क यांनी निर्मात्यांसह जाहिरातींचे उत्पन्न सामायिक करण्याबद्दल बोलले होते. त्यानंतर त्यांनी हा उपक्रम जागतिक स्तरावर सुरू केला. आता मस्क न्यूज ऑर्गनायझेशन आणि इतर कंपन्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगत आहे.

अशा पद्धतीने होणार व्हेरिफिकेशन

आता ट्विटरवर व्हेरिफिकेशन करणं अधिक सोप होणार आहे. याकरता तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट हे डाॅक्युमेंट्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात.  ट्विटरने याबाबत  कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच ही सुविधा येणार असं सांगण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Smartphoes Tips : सायलेंट मोडवर असलेला अँड्रॉइड फोनही शोधता येईल; फक्त ‘हे’ फिचर वापरा

[ad_2]

Related posts