Big Blow To Team India Before Asia Cup 2023 Starts, Coach Dravid Said How Plan Was Failed ; आशिया कपपूर्वी द्रविड यांची चिंता वाढली, म्हणाले दीड वर्षांपूर्वीच्या प्लॅनचा बसला मोठा फटका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : तब्बल दीड वर्षांपूर्वी भारातचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक प्लॅन बनवला होता. पण आता त्याचा मोठा फटका बसल्यचाे समोर आले आहे. द्रविड यांनी नेमका कोणता प्लॅन बनवला होता आणि त्याचा फटका कसा बसला आहे, हे द्रविड यांनी आशिया कपची पहिली मॅच सुरु होण्यापूर्वी सांगितले आहे.

‘वर्ल्ड कपमध्ये भारताचा चौथा आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज कोण असेल, याबाबतचा निर्णय जवळपास अठरा महिन्यांपूर्वीच झाला होता. मात्र, तीन फलंदाजांना लागोपाठ दुखापती झाल्यानंतर आखलेल्या योजनांना फटका बसला,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी व्यक्त केले.

द्रविड यांनी ज्या तीन खेळाडूंचा उल्लेख केला, ते म्हणजे श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत. या तिघांना ठरावीक अंतराने दुखापती झाल्याने मधल्या काळात भारतीय संघव्यवस्थापनाने वेगवेगळे पर्याय पडताळून पाहिलेत. अर्थात, केवळ फायद्यासाठी हे प्रयोग नव्हते. ‘फलंदाजीतील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाबाबत बरीच चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णयाबाबत स्पष्टता नाही. अर्थात, १८ महिन्यांपूर्वी मी तुम्हाला याबाबत सांगू शकलो असतो. या दोन जागांसाठी आमच्याकडे तीन पर्याय होते. हे तीन पर्याय म्हणजे अय्यर, राहुल आणि पंत. दुर्दैवाने या तिघांना दोन महिन्यांच्या आत दुखापती झाल्या. वर्ल्ड कप जवळ आला असताना ते तंदुरुस्त नाहीत, हे लक्षात आल्यावर आमच्याकडे इतर खेळाडूंना त्या जागेवर खेळवून पाहण्याशिवाय पर्यायच उरला नाही. प्रयोग, हा शब्द आम्हाला सातत्याने ऐकवला जातो. मात्र, हे प्रयोग आम्ही उगाचच केले जात नाही. त्याला विशिष्ट कारण असते,’ असे द्रविड यांनी सांगितले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतच्या कारला अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर मार्च आणि मे महिन्यात अनुक्रमे अय्यर आणि राहुलला पाठीची आणि मांडीची दुखापत झाली. अय्यर आणि राहुल दुखापतीतून सावरले आहेत. त्यांचा आशिया कपसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया कपमध्ये राहुल पहिल्या दोन लढतींना मुकणार आहे. ‘राहुल आता तंदुरुस्त दिसतो आहे. आता आम्हाला त्याला खेळासाठी वेळ द्यावा लागणार आहे. हा वेळ त्याला आशिया कपमध्ये मिळणार आहे. जेणेकरून तो वर्ल्ड कपसाठी तयार होईल. सराव शिबिरात त्याने तंदुरुस्ती दाखवली आहे. त्याने फलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचा सराव केला आहे,’ असे द्रविड यांनी सांगितले.

[ad_2]

Related posts