[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हा सामान सुरु झाला आणि एकामागून एक भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज यायला सुरुवात झाली. कारण पहिली गोष्ट तर या सामन्यावर पावसाचे सावट होते. पण हा सामना निर्धारीत वेळेत सुरु झाला. त्यानंतर भारतासाठी अजून एक गुड न्यूज आली, ती म्हणजे रोहित शर्माने या मॅचचा टॉस जिंकला. त्यानंतर रोहित शर्माने चौकारासह दणक्यात सुरुवात करत आपल्या चाहत्यांना अजून एक आनंदाची बातमी दिली. पण या सामन्यात एक गोष्ट पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्याची सुरुवात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदीने केली. या पहिल्याच षटकात रोहितने त्याला चौकार लगावला. त्यानंतर रोहितने ेक धाव काढली आणि शुभमन गिलला स्ट्राइक दिली. या षटकातील अखेरचा चेंडू गिलने संयीपणे खेळून काढला. या षटकानंतर या सामन्यात पहिल्यांदाच एक गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. कारण गेल्या बऱ्यात काळापासून शाहीन आफ्रिदी आणि गिल हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. पण आशिया कपमध्ये हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. या सामन्यात ही एक अशी गोष्ट होती, जी पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळाले. गिलने यावेळी संयतपणे आपल्या खेळाला सुरुवात केली. कारण पहिल्या आठ चेंडूमध्ये त्याने एकही धाव केली नव्हती. कारण शांतपणे तो पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. पण दुसरीकडे रोहित शर्मा मात्र चांगल्या फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने चौकारानिशी दमदार सुरुवात केली होती. त्यानंतरही रोहितने अजून एक चौकार लगावला. त्यामुळे रोहित हा चांगल्या फॉर्मात आल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले.
भारतीय संघाची ४.२ षटकांत बिनबाद १५ अशी धावसंख्या असताना पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला होता. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा ११ धावांवर खेळत होता.
[ad_2]