[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
MI vs GT, IPL 2023 Qualifier 2 Live: गुजरात आणि मुंबई यांच्यामध्ये क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर मुंबई आणि गुजरात यांच्यात लढत होणार आहे. यामधील विजेता संघ चेन्नईबरोबर रविवारी फायनलला खेळणार आहे. पण आजचा सामना पावसामुळे अथवा इतर कारणामुळे रद्द झाला तर फायनलला कोण जाणार? अहमदाबादमधील वातावरण सध्या स्वच्छ आहे.. सामन्यादरम्यान हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे, परंतु क्वालिफायर 2 साठी राखीव दिवस नाही. त्यामुळे पाऊस पडला अथवा इतर काही कारणामुळे सामना रद्द झाला तर काय? विजेता कसा ठरवला जाईल? स्पर्धेतील दुसरा अंतिम फेरीचा संघ कसा ठरवला जाईल, चेन्नईबरोबर फायनल कोण खेळणार ? याबाबत समजून घेऊयात..
आज, 26 मे रोजी गुजरात आणि मुंबई यांच्यामध्ये होणार आहे. हा सामना पावसामुळे सुरू झाला नाही किंवा अनिर्णित राहिला, तर गुजरात टायटन्सला या सामन्याचा विजेता घोषित केले जाईल. कारण गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरात संघाने साखळी फेरीतील 10 सामन्यात विजय मिळवलाय. 20 गुणांसह गुजरात संघ गुणातलिकेत पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. मुंबईला साखळी फेरीत फक्त आठ सामन्यात विजय मिळवता आले. अहमदाबादमधील हवामान साफ आणि स्वच्छ आहे. पावसाची कोणतीही शक्यता नाही.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
[ad_2]