Shubman Gill Can Become Number One Icc Odi Batsman In Ind Vs Aus Odi Series Know Whole Equation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC ODI Rankings Shubman Gill : आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.  पण भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल याने रेटिंग गुणातील अंतर कमी केले आहे. बाबर आझमच्या नावावर सध्या  857 रेटिंग गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अणाऱ्या गिलकडे 814 रेटिंग गुण आहेत. दोघांमध्ये फक्त 43 रेटिंग गुणांचा फरक आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत गिल याच्याकडे क्रमांक एकचा फलंदाज होण्याची संधी आहे. तीन वनडे सामन्यात शुभमन गिल याने २०० धावा केल्यास तो आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचू शकतो. दरम्यान, वनडे क्रमवारी विराट कोहली सध्या आठव्या क्रमांकावर विराजमान आहे.  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिल याची बॅट सध्या तळपत आहे. आशिया कपमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक आणि नंतर बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले. वनडे क्रिकेटमध्ये गिल सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पण त्याला नंबर वन बनण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघ शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत २०० काढल्यास  गिल वनडेमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनू शकतो.

आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारताचा शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली आठव्या तर रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत सिराज पहिल्या स्थानावर आहे. कुलदीप यादव नवव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर आहे.

वनडेतील मागील पाच डावात कशी राहिली कामगरी – 

वनडेतील मागील पाच डावात शुभमन गिल याने दमदार कामगिरी केली आहे. दोन अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. गिल पाचपैकी दोन डावात नाबाद राहिला आहे. त्याने नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके झळकावली, तर बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले. गिलने मागील पाच एकदिवसीय डावांमध्ये अनुक्रमे 67*, 58, 19, 121 आणि 27* धावा केल्या आहेत.

गोलंदाजीत मोहम्मद सिराज अव्वल –

आशिया चषकाला सुरुवात होण्यापूर्वी मोहम्मद सिराज 643 रेटिंग गुणांसह वनडे क्रमवारीत नवव्या क्रमांकावर होता. आशिया चषकात भेदक मारा केल्याचा फायदा सिराजला झाला. ताज्या क्रमवारीनुसार त्याने 8 स्थानांनी झेप घेत पहिले स्थान मिळवले आहे. सिराजचे आता 694 रेटिंग गुण आहेत. आशिया कप स्पर्धेमध्ये सिराजने 12.2 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या होत्या. याआधी मोहम्मद सिराज मार्च 2023 मध्ये वनडे क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचला होता, त्यानंतर जोश हेजलवुडने त्याला त्या स्थानावरून हटवले होते. आता पुन्हा एकदा सिराजने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. 

आणखी वाचा :

ODI Ranking Bowler : मोहम्मद सिराजचे मोठी झेप, वनडे क्रमवारीत थेट अव्वल स्थान पटकावले

[ad_2]

Related posts