Ravi Ashwin Picks First Odi Wicket After 611 Days Marnus Labuschagne In Ind Vs Aus

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ravi Ashwin Out Marnus Labuschagne Video : मोहालीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. या विजयासह तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद शामी याने पाच विकेट घेतल्या. त्याला आर. अश्विन याने चांगली साथ दिली. अश्विन याने दीर्घकाळानंतर वनडे संघात पदार्पण केले. जवळपास २० महिन्यानंतर अश्विन वनडे सामन्यात खेळला. या सामन्यात अश्विन याने कंजूष गोलंदाजी केली. त्याशिवाय मार्नस लाबुशेन याची महत्वाची विकेटही घेतली. अश्विन याने ६११ दिवसानंतर वनडेमध्ये विकेट घेतली. अश्विनने लाबुशेनला बाद केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

रविचंद्रन अश्विन याच्या चेंडूवर लाबुशेन याने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण विकेटच्या मागे असणाऱ्या केएल राहुल याने स्टम्पिंग केली. मार्नस लॅबुशेन विचित्र पद्धतीने बाद झाला तो चर्चेचा विषय आहे. याशिवाय मार्नस लॅबुशेन बाद झाल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडिया युजर सातत्याने कमेंट करत आहेत. 

वनडे फॉर्मेटमध्ये 20 महिन्यानंतर परतला अश्विन 

मोहाली वनडे सामन्यात अश्विन याने दमदार गोलंदाजी केली. अश्विनने दह षटकांत ४७ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. अक्षर पटेल याला दुखापत झाल्यामुळे अश्विनला संधी दिली आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार कामगिरी केल्यास विश्वचषकाचे तिकिट मिळू शकते.   भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत अश्विनने चांगली कामगिरी केल्यास विश्वचषक संघासाठी दरवाजे उघडू शकतात, असे मानले जात आहे. त्यामुळे ही मालिका अश्विनसाठी खूप महत्त्वाची आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याचा लेखाजोखा –
 मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलेय. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे



[ad_2]

Related posts