CM Eknath Shinde reaction on Ayodhya Ram Mandir Inauguration also attack on Uddhav Thackeray detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : अयोध्येत राम मंदिराची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर मुंबईतील दादर परिसरातून वडाळ्यातील राम मंदिरातील शिंदे गटाकडून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील सहभाग घेतला. जो राम का नही वो कोई काम का नहीं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी देत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. राम मंदिराचे आमंत्रण असतानाही उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. यावरु मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

मुख्यमंत्र्यांसह या रॅलीमध्ये शिंदे गटातील अनेक नेते देखील उपस्थित होते. राहुल शेवाळे, किरण पावस्कर, दीपक केसरकर देखील उपस्थित होते. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे देखील साकारण्यात आले होते. ऐतिहासिक अशी शोभायात्रा रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने निघाली असल्याची प्रतिक्रिया यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढे त्यांनी म्हटलं की, आजचा दिवस हा ऐतिहासिक असून सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आज कोट्यावधी रामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालंय. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालंय. हजारो, लाखो लोकांमध्ये आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. 

उद्धव ठाकरेंवर निशाणा

जो राम का नही वो कोई काम का नही, अशी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच आज ठिकठिकाणी राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आशयाचे बॅनर लागले आहेत, पण यामध्ये ठाकरे गटाचे बॅनर कुठेही पाहायला मिळत नाही. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना देखील अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण आले होते. परंतु अयोध्येला न जाता उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच त्यांनी यावेळी गोदातीरी जाऊन आरती देखील केली. 

पंतप्रधान मोदींचे मानले आभार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले आहेत.त्याचं अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केलं. आजचा हा ऐतिहासिक सोहळ्या संपूर्ण देशाने अनुभवला अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते. 

हेही वाचा : 

हा एक ऐतिहासिक दिन, आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालायला हवं, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राष्ट्रपती मुर्मू यांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts