( प्रगत भारत । pragatbharat.com)
Trending Love Story : सोशल मीडियावर अजून लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. सीमा हैदरनंतर अनेक लव्ह स्टोरी समोर आल्यात. आता 35 वर्षीय पाकिस्तानी तरुणाने 70 वर्षांच्या कॅनडाच्या आजीशी लग्न केलं आहे. नईम शहजाद असं तरुणाचं नाव सोशल मीडियावर त्याच्या प्रेमावर टीका केली आहे. गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी प्रेम कहाणींचा अजून काही ट्रेंडचं आला आहे. सीमा हैदरनंतर अनेक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. (Trending love story Pakistani man 35 married with 70 year old Canadian woman gold digger cross border Viral News)
असं म्हणतात प्रेमात ना वय महत्त्वाच असतं, ना रंग आणि धर्म…डेली पाकिस्तानच्या रिपोर्ट्नुसार नईमला मात्र त्याच्या प्रेमावरून नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. हे प्रेम नसून नईमला गोल्ड डिगर म्हणून हिनवलं जात आहे.
या टीकवर त्याने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीला आपल्या प्रेमाबद्दल सविस्तर सांगितलं. पाकिस्तानी तरुण आणि कॅनडियन आजीची प्रेम कहाणी देखील फेसबुकवरुन सुरु झाली. या दोघांमध्ये 7 वर्षांपूर्वी फेसबुकवरुन मैत्री झाली. नईमने आजीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ती त्यांनी स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरु झालं आणि दोघांमध्ये प्रेमाचे सूर जुळले. नईमचं म्हणं आहे की, आमच्यामध्ये प्रेम कधी झालं हे आम्हालाही समजलं नाही.
त्यानंतर 2017 मध्ये नईमने आपल्या प्रेमाला लग्नाची मागणी घातली. आजीनेही विचार केला आणि त्यांच्या या प्रेमाचा स्विकार केला. त्या दोघांमधील वयामुळे अनेक शंका निर्माण झाल्या होत्या त्यावर मात करत या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नासाठी आजी कॅनडाहून पाकिस्तानात आली आणि दोघांनी लग्न केलं. आता तरुणाला पत्नीसोबत कॅनडाला राहायचं आहे. त्याने व्हिसासाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला. त्याने पुन्हा कॅनडामध्ये जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला आहे. या लग्नामुळे नईमला टीकेकरांचा सामना करावा लागतोय. त्याने हे लग्न पैशांसाठी तर जण म्हणतात की, कॅनडामध्ये जाण्यासाठी हे लग्न केलं आहे.
मात्र नईमने या आरोपांचं खंडन केलं आहे. तो म्हणाला की, आयुष्यातील माझा प्रेमाचा जीवनसाथीसोबत मला स्थिर जीवन करण्यासाठी हे लग्न केलं आहे. पण दुसरीकडे त्याने हेही सांगितलं की, पैशांबाबत पत्नी त्याला मदत करत असते. धक्कादायक म्हणजे नईमने काम करु नये असं त्याच्या पत्नीला वाटतं. खरं तर ही महिला श्रीमंत नसून तिला मिळत असलेल्या पेन्शवर आपलं आयुष्य जगत आहे. पण नईम म्हणाला की, पैसे कमावण्यासाठी तो एक यूट्यूब चॅनेल सुरु करणार आहे.