Maharashtra Pune Ajit Pawar Meets Bhau Kadam Baramati Ganeshotsav Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेतल्या. त्यानंतर अजित पवारांनी बारामतीतील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. अजित पवारांच्या भेटीदरम्यान एक रंजक किस्सा घडला. अनेक कार्यकर्ते अजित पवारंच्या भेटीसाठी उपस्थित होते. बारामतीतील एका मंडळांच्या ठिकाणी अजित पवार गेले असता त्यांना चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam) आणि ओंकार भोजणे भेटले. अजित पवारांनी भाऊ कदम यांना बघताच नमस्कार केला आणि त्यांचे कौतुक केले. भाऊ कदम अनेक मराठी प्रेक्षकांच्या  गळ्यातील ताईत झाला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणून भाऊ कदम ओळखला जातो. आपल्या उत्तम टायमिंगने आणि प्रचंड मेहनतीने भाऊ कदमने अनेकांची मने जिंकली आहेत. ‘चला हवा येऊ द्या’नंतर भाऊ कदम चर्चेत आला. शनिवारी अजित पवारांनी आज सपत्नीक गणेश मंडळांना भेट देऊन आरती केली.अजित पवारांनी भाऊ कदम यांना बघताच नमस्कार घातला. ” मी रात्री तुमचे कार्यक्रम पाहतो. माझा दिवभराचा थकवा निघून जातो” असे अजित पवार म्हणाले. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी बारामतीतील विविध गणपती मंडळांना भेट दिली होती. 

अजित पवारांनाही भाऊ कदम यांची भुरळ

‘चला हवा येऊ द्या’ हा  कार्यक्रम गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या  कार्यक्रमाबरोबरच त्यात काम करणारे कलाकारही खूप लोकप्रिय आहेत. भाऊ कदम  त्यांच्या विनोदी शैलीसाठी लोकप्रिय आहे.  त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. हे कलाकार फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता अजित पवारांनाही भाऊ कदम यांची भुरळ पडली आहे.  

राज्यात भरपूर पाऊस पडू दे, गणरायकडे अजित पवारांचे साकडे

बारामती तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली.. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर बारामतीतील गणेश मंडळांना भेटी सुरू आहेत. त्यादरम्यान त्यांनी राज्यात भरपूर पाऊस पडू दे सर्वांना सुख समृद्धी लाभू दे शेतकरी समाधानी होऊ दे असं साकडं गणरायकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले. 

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

Ajit Pawar : उजनीत ढगफुटीसारखा पाऊस पडला पाहिजे, पण …; बारामतीत काय म्हणाले अजित पवार?

[ad_2]

Related posts