( प्रगत भारत । pragatbharat.com)
October Grah Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतात. यावेळ आगामी ऑक्टोबर महिन्यात काही मोठे ग्रह गोचर करणार आहेत. ऑक्टोबर महिना सुरू होणार असून आणि या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 3 मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. यावेळी या ग्रहांच्या राशी बदलाचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया ऑक्टोबरमध्ये कोणत्या 6 ग्रहांचे संक्रमण होणार आहेत.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 67 दिवस लागतात. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:45 वाजता बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे कन्या रास, सिंह रास आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.
त्यानंतर 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 1:18 वाजता शुक्र ग्रह गोचर करणार आहे. शुक्राचं गोचर हे सिंह राशीत होणार आहे. शुक्र हा सौंदर्य, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. अशा स्थितीत सिंह राशीत शुक्राचा प्रवेश धनु आणि मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सलग 3 दिवस ग्रहांचं गोचर होणार आहे. बुध आणि शुक्र ग्रहानंतर 3 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 6.16 वाजता मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते.
सूर्य देव प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्येही सूर्य ग्रह गोचर करणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 1:42 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये मंगळ आधीच या राशीमध्ये आहे. अशा स्थितीत मंगळ आणि सूर्याच्या संयोगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. यावेळी सिंह आणि धनु राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार असून धनलाभ होणार आहे.
तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राहू-केतूच्या गोचरमुळे अनेक राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1:33 वाजता राहू मेष सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी मेष, मिथुन, वृश्चिक आणि धनु राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.