[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asian Games 2023, IND vs BAN Playing 11 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 21 सुवर्णपदकांची लूट केली आहे. पुरुष क्रिकेट संघाकडूनही भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. 6 ऑक्टोबर, शुक्रवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील भारतीय संघ बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश कऱण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. उप उपांत्य फेरीच्या सामन्यात नेपाळचा पराभव करत भारताने फायनलमध्ये धडक मारली होती. आता भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना होणार आहे.
सेमीफायनल कधी ?
6 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सकाळी साडेसहा वाजता सामना होईल. तर पाकिस्तानचा सामना त्याच दिवशी दुपारी 11.30 वाजता होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा अंतिम सामना सात ऑक्टोबर रोजी 11.30 वाजता होणार आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये फायनल?
चीनमधील हांगझू येथे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उप उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळचा पराभव केला होता. तर पाकिस्तान ने हाँगकाँगला पराभूत केले होते. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानसोबत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ बांगलादेश आणि अफगाणिस्तानपेक्षा बलाढ्य आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत फायनल होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर 14 ऑक्टोबर आधीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर सामना होईल.
Get ready for another India vs Pakistan match in asian games final.
Here is the schedule for semi finals.#AsianGames2023#IndVsBan pic.twitter.com/qN2s0x7VCx
— Kumar Rajesh (@i_am_KrRajesh) October 5, 2023
भारतीय टीम की संभावित प्लेइंग 11
यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, रवि बिश्नोई, अवेश खान, अर्शदीप सिंह
बांग्लादेश की संभावित प्लेइंग 11-
परवेज़ हुसैन इमोन, महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, सैफ हसन (कर्णधार), अफीफ हुसैन, शहादत हुसैन, जकर अली (विकेटकीपर), रिशद हुसैन, सुमोन खान, रकीबुल हसन, रिपन मोंडोल
आणखी वाचा :
Asian Games 2023 : विश्वचषकाआधी चीनमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना?
[ad_2]