[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs AUS, World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरोधात केएल राहुलने 97 धावांचा डोंगर रचला. ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दोन धावांवर तीन गडी बाद झाल्यावर राहुल आणि कोहलीनं सामन्याची जबाबदारी सांभाळत संघाला विजय मिळवून दिला. केएल राहुलने सामन्यात चौकार लगावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. राहुलने सांगितलं की,
”मी अंघोळ करून आराम करणार होतो…”
सामनावीर पुरस्कार स्वीकारताना केएल राहुलने सांगितलं की, ”मी आणि कोहली मैदानावर शांत होतो, जास्त बोलत नव्हतो. मी सुरुवातीला सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करत होतो.” राहुलने पुढे सांगितलं की, ”मी तर अंघोळ करुन ड्रेसिंग रुममध्ये बसलो होतो. मला वाटलं किमान अर्धा तास आराम करता येईल. तेवढ्यात 3 विकेट पडल्या आणि मला मैदानात उतरावं लागलं. कोहलीने मला सांगितलं की, जोखीमीचे शॉट खेळण्यासोबतच आपल्याला काही वेळ टी-20 सारखं खेळावं लागेल. सुरुवातीला वेगवान गोलंदाजीची मदत झाली. पण, त्यानंतर दव पडल्याने फलंदाजीसाठी मदत झाली.”
An incredible 97* in the chase when the going got tough 👏👏
KL Rahul receives the Player of the Match award as #TeamIndia start #CWC23 with a 6-wicket win 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rY7RfHM1Bf
— BCCI (@BCCI) October 8, 2023
दुखापतीनंतर केएल राहुलचा शानदार फॉर्म
केएल राहुलने दुखापतीनंतर दमदार कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात राहुलने शानदार खेळी केली. केएल राहुलने 97 धावांची दमदार खेळी केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात केएल राहुलला सामनावीर पुरस्कार मिळाला. यासोबतच राहुलने टीकाकारांना चांगली चापट दिली आहे. दुखापतीनंतर पहिल्याच सामन्यात केएल राहुलने आशिया कपमध्ये शतकी खेळी केली. यानंतर आता पुन्हा एकदा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात 97 धावांची थरारक खेळी करत केएल राहुलने पुन्हा एकदा त्याचा दमदार फॉर्म दाखवून दिला आहे.
सामन्यानंतर काय म्हणाला केएल राहुल? पाहा व्हिडीओ :
@klrahul is the player of the Match.#INDvsAUS #AsianGames23 #KingKohli #طوفان_الأقصى #icccricketworldcup2023 #WC2023 #shakib #RohitSharma𓃵 #RohitSharma𓃵 #wasim #Brighton #BabarAzam #ViratKohli #iccworldcup #GOAT𓃵 pic.twitter.com/vtK3cIvoYG
— XSportsLady (@XSportscom) October 8, 2023
[ad_2]