IND Vs AFG ODI World Cup 2023 Afghanistan Have Elected To Bat Against Team India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs AFG, ODI World Cup 2023 : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये विश्वचषकाचा सामना सुरु आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतीय संघ प्रथम गोलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानच्या संघात कोणताही बदल कऱण्यात आलेला नाही. पहिल्या सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे.

भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. खेळपट्टी पाहून भारतीय संघाने शार्दूल ठाकूर याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे. अश्विन याला प्लेईंग 11 मधून आराम देण्यात आला आहे. 

भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

अफगाणिस्तानची प्लेईंग 11

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान, अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक़, मुजीब उर रहमान, फजलहक़ फारुकी.

भारतीय फलंदाज अन् अफगाण गोलंदाज – 

धावांचा पाऊस पडणाऱ्या मैदानात भारतीय फलंदाज आणि अफगाण गोलंदाज असा सामना होणार आहे. अफगाणिस्तानकडे एकापेक्षा एक अव्वल दर्जाचा फिरकी मारा आहे. त्यामध्ये  राशिद खान, मोहम्मद नबी आणि मूजीब या चार गोलंदाजांचा समावेश आहे. तर दुसरीकडे भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे दर्जेदार फलंदाज आहेत. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होणार आहे. 

रोहित-विराटच्या कामगिरीकडे नजरा – 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधात भोपळाही फोडता आला नाही. पण दिल्लीमध्ये रोहित शर्मा चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या पहिल्या सामन्यात 400 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मा वेगाने धावा काढू शकतो. दिल्लीची खेळपट्टी सपाट आहे, रोहित शर्माला या खेळपट्टीवर मोठी खेळी करण्याची संधी असेल. 

भारताच्या प्रत्येक सामन्यात किंग कोहलीच्या कामगिरीकडे नजरा असतात. त्यात दिल्ली कोहलीचे होम ग्राऊंड आहे. लहानपणापासून कोहली या मैदानावर खेळला आहे. त्यामुळे मैदानाची संपूर्ण माहिती कोहलीला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात कोहलीने 85 धावांची खेळी करत दमदार सुरुवात केली होती. आता आजही होणाऱ्या सामन्यात कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. विराट कोहली जितका संयमी फलंदाजी करतो, तितकाच आक्रमक फंलदाजीही करण्यातही माहीर आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा असतील.

[ad_2]

Related posts