Indian Government Issues Warning For Google Pixel Samsung Oneplus Android Know All Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Government Issues Warning: भारतामध्ये Android युजर्सची संख्या मोठी आहे. भारतासह जगभरातील कोट्यवधी स्मार्टफोन अँड्रॉई़़ड ऑपरेटिंग सिस्टिमवरच (OS) काम करतात. पण, याच अँड्रॉईड युजर्ससाठी केंद्र सरकारच्या वतीनं एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेली ही अॅडव्हायझरी Android OS Version 11, 12, 12L आणि 13 वर काम करणाऱ्या सर्व स्मार्टफोनच्या युजर्ससाठी आहे. 

Android OS वर Google, Samsung, Realme, Redmi, OPPO, Vivo आणि OnePlus यांसारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन्स काम करतात. जर तुम्ही Apple iPhone व्यतिरिक्त इतर ब्रान्ड्सचा स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. त्यासोबतच तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. 

CERT-In नं दिलाय इशारा 

इंटरनेट आणि वर्च्युअल जगाच्या धोक्यांपासून भारतीय लोकांचं संरक्षण करण्यासाठी, इंडियन कंप्युटर एमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) नं एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. सरकारी एजन्सीनं मल्टीपल वल्नरबिलिटी (लूप होल्स/कमकुवतपणा) उघड केल्या आहेत, ज्या Android मोबाईलसाठी धोकादायक ठरू शकतात. या वल्नरबिलिटीच्या मदतीनं हॅकर्स सामान्य लोकांच्या फोनमधील महत्त्वाच्या डेटामध्ये प्रवेश करू शकतात.

हॅकर्स आणि स्कॅमर्स लक्ष्य करू शकतात

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असलेल्या, CERT-In च्या मते, या वल्नरबिलिटीच्या मदतीनं, हॅकर्स आणि स्कॅमर Android स्मार्टफोनमधील संवेदनशील डेटा एक्सेस करू शकतात आणि बँक खात्यांमध्ये प्रवेश देखील करू शकतात.

फोनमध्ये असतो महत्त्वाचा डेटा अन् बँक डिटेल्स 

स्मार्टफोन हा आपल्या जीवनशैलीचा एक आवश्यक भाग आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये आपला खासगी डाटा असतो. ज्यामध्ये बँक डिटेल्स, OTP आणि वैयक्तिक डेटा असतो. हॅकर्स किंवा स्कॅमर डिव्हाइस हॅक करू शकतात आणि त्यातून महत्त्वाचा डेटा, फोटो आणि अगदी बँक खाती काढून टाकू शकतात.

अँड्रॉइड फोनसाठी धोकादायक

CERT-In च्या मते, या वल्नरबिलिटीच्या मदतीनं, Android OS वर काम करणार्‍या हँडसेटचं फ्रेमवर्क, सिस्टम, Google Play सिस्टम, मीडियाटेक कंपोनेंट्स, Unisoc कंपोनेंट्स, Qualcomm कंपोनेंट्स इत्यादींशी तडजोड केली जाऊ शकते. युजर्सना माहिती न देता, ते मोबाईलमध्ये प्रवेश करू शकतात आणि युजर्सच्या नकळत त्यांच्या मोबाईलचा एक्सेसही घेऊ शकतात. 

कसा कराल बचाव? 

कंपनी मोबाईल युजर्ससाठी वेळोवेळी OS आणि सिक्योरिटी अपडेट्स जारी करते. अनेक युजर्सना हे अपडेट्स अनावश्यक वाटतात आणि मोबाईल ओएस अपडेट करत नाहीत. तुम्हीही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि अपडेट्सकडे दुर्लक्ष करु नका.  युजर्सनी सिक्युरिटी अपडेट्स अप टू डेट ठेवणं गरजेचं आहे. 

[ad_2]

Related posts