[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indian Team In ODI World Cup : यजमान भारताने विश्वचषकात शानदार सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने लागोपाठ तीन सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कब्जा मिळवला आहे. भारतीय संघाला मागील 12 वर्षांपासून आयसीसीच्या चषकाची प्रतिक्षा आहे. वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यात मागील 12 वर्षांत भारताला अद्याप जेतेपद मिळाले नाही. भारतायी संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली आहे. पण मागील दोन वनडे विश्वचषकात मोक्याच्या क्षणी भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2015 विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वात आणि 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला जेतेपद मिळवता आले नाही.
2011 च्या विश्व कप स्पर्धेनंतर टीम इंडियाने 17 साखळी आणि दोन नॉकआऊट सामने खेळले आहेत. 17 लीग सामन्यापैकी भारताने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. फक्त एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध संघाकडून नॉकआऊट फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2015 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत भारताचा 95 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर 2019 च्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
2015 च्या विश्वचषकात भारताने सहा साखळी सामने खेळले होते. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला होता. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने साखळी फेरीत 8 सामने खेळले होते. यामध्ये इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2015 आणि 2019 मध्ये नॉकआऊट स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. 2011 नंतर भारताने 17 साखळी सामन्यापैकी 16 मध्ये विजय मिळवला आहे तर दोन नॉकआऊट सामन्यात पराभव झाला आहे. 2023 चा विश्वचषक मायदेशात होत आहे. आतापर्यंत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मायदेशात होत असलेल्या विश्वचषकात उतरली आहे. आतापर्यंत भारताने शानदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारताने शानदार कामगिरी केली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अजेय आहे. भारताचा पुढील सामना बांगलादेशविरोधात पुण्यात होणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव.
[ad_2]