Deccan Queen 93rd Birthday : ‘डेक्कन क्वीन’चा 93 वा वाढदिवस, पुणे रेल्वे स्टेशन गजबजले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई आणि पुणे प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या डेक्कन क्वीनचा (Deccan Queen)  आज 93 वा वाढदिवस. 1 जून 1930 पुणे मुंबई पुणे या मार्गावर इलेक्ट्रिक हायस्पीड, कम्फर्ट, लक्झरी अशा सुविधांनी परिपूर्ण असलेली ही रेल्वे गेल्या 92 वर्षांपासून धावत आहे. डेक्कन क्वीन ही जगातील एकमेव रेल्वे असून तिचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. 

आज सुद्धा सकाळी साडेसहा वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रेल्वेच्या इंजिनचे पूजनही करण्यात आले. अनेक वर्षांपासून या डेक्कन क्वीन (Deccan Queen) मधून पुणे-मुंबई प्रवास करणारे हजारो प्रवासी आहे. आज या रेल्वेला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता, मात्र आता मोठ्या उत्साहामध्ये स्टेशन मास्तर, प्रवासी संघाच्या हर्षा शहा आणि याच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एकत्र येऊन पुणे रेल्वे स्थानकावर एक कापून वाढदिवस साजरा केला आहे.

Related posts