Babar Azam Pakistan In World Cup 2023 Is Pakistan Out Of The World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan In World Cup 2023 : बाबार आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान आता खूपच खडतर झाले आहे. पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय का ? हा अनेकांना प्रश्न पडला असेल. पण पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अद्याप जिवंत आहे. पण त्यासाठी पाकिस्तान संघाला आपल्या खेळ 200 टक्केंनी उंचवावा लागणार आहे. अफगाणिस्तान संघाविरोधातील पराभव (pakistan vs afghanistan) पाकिस्तानच्या जिव्हारी लागणार आहे. कारण, आता पुढील सर्व सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा विश्वचषकातून गाशा गुंडाळावा लागेल. 

अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला धक्का – 
अफगाणिस्तानच्या जिगरबाज संघानं पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, यंदाच्या विश्वचषकात दुसरा पराक्रम घडवला आहे. अफगाणिस्ताननं याच विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून मोठी खळबळ निर्माण केली होती. त्यापाठोपाठ आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानलाही लोळवण्याची कामगिरी बजावली आहे. या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानला विजयासाठी ५० षटकांत २८३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी यशस्वी पाठलाग केला. रहमान उल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह आणि कर्णधार हशमत आफ्रिदीनं जबाबादारीनं खेळ करून आपल्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिला आहे.

पाकिस्तानचा तिसरा पराभव – 

आज पाकिस्तानचा लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे.  पाकिस्तानन संघ गुणातातिलेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तानला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा रनरेटही मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचे सामना शिल्लक आहेत. पाकिस्तान संघाला नेदरलँड आणि श्रीलंकाविरोधात विजय मिळवता आला. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाकडून पराभव स्विकाराला आहे.

आता पुढे काय ?

पाकिस्तान संघाला पाच सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. त्यांना भारत, आस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाकडून पराभव स्विकारावा लागला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया तगडे संघ आहेत, पण दुबळ्या अफगाणिस्तानकडून पराभव स्विकारावा लागल्यामुळे सर्व गणितं बदलली आहेत. आता उर्वरित चारही सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरोधात पाकिस्तानचा सामना आहे. यामधील बांगलादेश संघ कमकुवत आहे, पण इतर संघाविरोधात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला खेळ उंचवावा लागणार आहे. चारही सामन्यात फक्त विजय मिळवून पाकिस्तानचं भागणार नाही, पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. कारण, सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी नेटरनरेटही महत्वाचा ठरणार आहे. 

[ad_2]

Related posts