[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gautam Gambhir On Pakistan Team : पाकिस्तानचा लागोपाठ तीन सामन्यात पराभव झालाय, त्यामुळे विश्वचषकातील त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान आता जास्त खडतर झाले आहे. फलंदाजी, गोलंदाजीसोबत पाकिस्तानची फिल्डिंगही अतिशय खराब आहे. विश्वचषकात सर्वाधिक खराब फिल्डिंग पाकिस्तान संघाची आहे. त्याचा फटका त्यांना बसलाय. त्यांना लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत, ऑस्ट्रे्लिया आणि अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव केला. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान आता जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्यावर निशाना साधलाय. गौतम गंभीरनेही पाकिस्तानला फिल्डिंगवरुन सुनावले आहे.
गौतम गंभीर काय म्हणाला ?
पाकिस्तानच्या पराभवाचे प्रमुख कारण, फिल्डिंग आहे. गोलंदाजी अथवा फलंदाजीत एखादा दिवस खराब असू शकतो, पण फिल्डिंगमध्ये नाही. आशिया चषकात पाकिस्तानच्या खेळाडूंनी सोपे झेल सोडले होते. त्या चुकापासून पाकिस्तान संघाने काहीही शिकलेले दिसत नाही, विश्वचषकातही त्याच चुका पुन्हा केल्या जात आहेत, असे गौतम गंभीर म्हणाला. पाकिस्तान संघाची फिल्डिंग सर्वात खराब आहे, असेही गौतम म्हणाला. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाजांनाही संघर्ष करावा लागत आहे. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. चेन्नईसारख्या खेळपट्टीवरही त्यांचे फिरकी गोलंदाज अपयशी ठरले आहेत. चेन्नईमध्ये दवचा कोणताही प्रभाव नव्हता, तरीही पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना अपयश आले. विकेट घेता आल्या नाहीत, त्याशिवाय धावाही खर्च केल्या.
पाकिस्तानची नेमकी अडचण काय ?
विश्वचषकात पाकिस्तानची फिल्डिंग खराब होतेय. त्याशिवाय त्यांची फिरकी गोलंदाजीही प्रभावी नाही. फिरकी गोलंदाजी पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्याशिवाय फलंदाजही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत नाहीत. आघाडीचे फलंदाज धावा करण्यात संघर्ष करत आहेत. एकाही फलंदाजाला गेमचेंजर फलंदाजी करता आली नाही, असे गौतम म्हणाला.
पाकिस्तानचा तिसरा पराभव –
आज पाकिस्तानचा लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. पाकिस्तानन संघ गुणातातिलेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तानला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा रनरेटही मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचे सामना शिल्लक आहेत. पाकिस्तान संघाला नेदरलँड आणि श्रीलंकाविरोधात विजय मिळवता आला. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाकडून पराभव स्विकाराला आहे.
[ad_2]