India Vs England India Defended 183 Against West Indies In The 1983 World Cup Final

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ : लखनौमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 229 अशी मजल मारता आली. कॅप्टन रोहित शर्माने 87 धावांची खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 49 धावा केल्या. तथापि, कमी धावसंख्येचा बचाव करण्यातही टीम इंडियाने आपली चलाखी दाखवली आहे. 2003 मध्ये वर्ल्डकपमध्ये भारताने नेदरलँड्सविरुद्ध 204 धावांचा बचाव केला होता. इतकंच नाही, तर इंग्लंडविरुद्ध, भारताने 1999 मध्ये त्यांच्या सामन्यात 232 धावा केल्या आणि 62 धावांनी सामना जिंकला. 1983 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 183 धावांचा बचाव करून वर्ल्डकप जिंकला होता. भारताने आतापर्यंत पाचवेळा कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे.

मीरपूर, ढाका (2014) मध्ये बांगलादेश विरुद्ध 105 धावांचा बचाव

2014 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या अवे मालिकेत भारताचा हा दमदार विजय होता. पावसाने कमी केलेला हा सामना 41 षटकांचा करण्यात आला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा संघ 25.3 षटकात केवळ 105 धावांवर आटोपला आणि कर्णधार सुरेश रैनाने सर्वाधिक 27 धावा केल्या होत्या. 

शारजाह (1985) मध्ये पाकिस्तान विरुद्ध 126 बचाव

1985 मध्ये शारजाहमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर भारताने 38 धावांनी मिळवलेला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 42.4 षटकांत केवळ 125 धावा केल्या. मोहम्मद अझरुद्दीन (93 चेंडूत 47) सर्वाधिक धावा करणारा ठरला. प्रत्युत्तरादाखल, कपिल देव, मदन लाल, रवी शास्त्री, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि रॉजर बिन्नी यांच्या गोलंदाजीने भारताने  केवळ 87 धावांत गुंडाळले होते. 

दरम्यान, आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 50 षटकांत 9 गडी गमावून 229 धावा केल्या. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य आहे. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने 101 चेंडूत सर्वाधिक 87 धावा केल्या. भारतीय कर्णधाराने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वाच्या धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने 47 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.

रोहित-सूर्यकुमार चमकले, पण बाकीच्या फलंदाजांची निराशा

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल 13 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. विराट कोहली एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने 16 चेंडूत 4 धावा केल्या. भारतीय संघाचे तीन खेळाडू 40 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 58 चेंडूत 39 धावा करून बाद झाला.

भारतीय फलंदाज सतत बाद होत राहिले, मात्र कर्णधार रोहित शर्माने एक वगळता वेग पकडला. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 182 धावा होती. रवींद्र जडेजा 13 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts