Babar Azam Pakistan Possibility For Semi Final World Cup 2023 Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistans qualification scenario for Semi Finals : पाकिस्तान संघाने बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव करत सेमीफायनलच्या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलेय. पण पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा रस्ता सोपा नाही. पाकिस्तान संघाला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवावाच लागेल. यामध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही तगड्या संघाचा समावेश आहे. इंग्लंड आपला शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल तर न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी जिवाचे रान करेल. पण न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पराभव केल्यास पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचणार का ? पाहूयात नेमकं काय समीकरण आहे… 

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये कसा जाणार ? 

पाकिस्तान संघाने जर न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाचा पराभव केला तर त्यांचे दहा गुण होतील. पण दहा गुणांसह पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये जाणार का? नाही… पाकिस्तानला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यासारख्या संघाचा पराभव झाला तरच पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता वाढेल. त्याशिवाय न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव व्हावा, अशी आशाही पाकिस्तानच्या चाहत्यांना करावी लागेल. न्यूझीलंड संघाचे तीन सामने अद्याप बाकी आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे.

पाकिस्तानचा विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी समीकरण काय ? 

– इंग्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव  

– ऑस्ट्रेलिया अथवा दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी एका संघाकडून अफगाणिस्तानचा पराभव

– दक्षिण आफ्रिका अथवा श्रीलंकाकडून न्यूझीलंडकडून पराभव

– भारताकडून श्रीलंका आणि नेदरलँडचा पराभव  

पाकिस्तानला या संघाकडून कडवी टक्कर …

ऑस्ट्रेलियाचेही अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला गतविजेत्या इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरोधात भिडायचेय. ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा दावेदार म्हटले जातेय. गुणतालिकेतील आघाडीच्या चार संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश दिला जातोय. पाकिस्तान संघ सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. पण त्यांचे सात सामने झाले, फक्त दोन शिल्लक आहेत. टीम इंडिया 12 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका सहा सामन्यात दहा गुणांसह दुसऱ्या, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा पराभवाची वाट पाहावी लागणार आहे. पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आशा जिवंत आहेत, पण अंतिम चारमध्ये स्थान मिळणं कठीण आहे. पाकिस्तान संघाला उर्वरित दोन सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागले, त्याशिवाय नशीबाचीही साथ लागणार आहे. 

कोणत्या संघाला विश्वचषकात जाण्याची किती संधी:

India – 99.9%.
South Africa – 95%.
New Zealand – 75%. 
Australia – 74%.

Afghanistan – 31%.
Pakistan – 13%.
Sri Lanka – 6%.
Netherlands – 5.8%.
England – 0.3%.
Bangladesh – ELIMINATED.

[ad_2]

Related posts