Ind Vs Sl World Cup 2023 Virat Kohli Batting Record Against Sri Lanka Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli vs Sri Lanka : एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) मध्ये भारताची (India) विजयी वाटचाल सुरु आहे. सलग सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून भारतीय संघाचे (Team India) दमदार कामगिरी केली आहे. विजय रथावर स्वार टीम इंडियाचा (Indian Cricket Team) सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंका (India vs Srk Lanka) संघाशी होणार आहे. मुंबई (Mumbai) तील वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) वर हा सामना रंगणार आहे. श्रीलंका विरुद्धचा सामना जिंकून भारत उपांत्य फेरीतील जागा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कडून चाहत्यांनाही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्ध विराटची आकडेवारी पाहता भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

वानखेडेवर श्रीलंकेविरोधात कोहलीची कामगिरी

श्रीलंकेसाठी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली कर्दनकाळ आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची आकडेवारी खूपच चांगली आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध विराट धावा काढण्यात पटाईत आहे. श्रीलंकेविरोधात कोहलीची बॅट चांगली चालते. विराटने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत 52 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये 50 डावात विराटला फलंदाजीची संधी मिळाली आहे. या 50 डावांमध्ये कोहलीने 62.65 च्या सरासरीने 2506 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध विराटने आतापर्यंत 10 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे, त्यामुळे या सामन्यातही विराटकडून मोठी खेळी पाहायला मिळण्याची अशा आहे.

वानखेडे स्टेडिअमवर मैदानावर विराटचे आकडे

विराट कोहलीची मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवरील आकडेवारी ही उत्तम आहे. कोहलीने आतापर्यंत या मैदानावर सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 53.80 च्या सरासरीने 269 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात शतकही झळकावलं आहे. विश्वचषक 2023 मध्ये विराट कोहलीने सहा सामन्यांमध्ये 354 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या विश्वचषकात तो 88.50 च्या सरासरीने धावा करत आहे.

कोहली विक्रम रचण्यापासून एक पाऊल दूर

विराट कोहली मास्टरब्लास्ट सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 48 शतके झळकावली आहेत. त्यामुळे विराट कोहलीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. श्रीलंकेविरुद्ध कोहलीने शतक ठोकल्यास वनडे विश्वचषकातील त्याचं हे चौथे शतक ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts