2023 World Cup Mitchell Marsh Ruled Out Against England As He Flew Back To Australia For Personal Reasons

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

2023 World Cup Mitchell Marsh :  पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात (2023 World Cup) आणखी एक मोठा धक्का बसलाय. आधी शानदार लयीत असलेला अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर आता अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) मायदेशी परतलाय. मिचेल मार्शने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याचे समजतेय. मोक्याच्या क्षणी महत्वाचे दोन खेळाडू नसल्यामुळे ऑस्ट्रेलियापुढील अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी गोल्फ खेळताना ग्लेन मॅक्सवेलला दुखापत झाली होती. आता मिचेल मार्शही मायदेशी परतलाय. त्यामुळे शनिवारी इंग्लंडविरोधात ऑस्ट्रेलियापुढील अडचणी वाढल्या आहेत. 

मिचेल मार्श इंग्लंडविरोधात होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करत दिली आहे. मिचेल मार्श पर्थ येथील आपल्या घरी परतल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलेय.  त्याने हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल याच्यानंतर मिचेल मार्शच्या रूपात ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे.  

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय माहिती  दिली  –

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज ट्विट करत मिचेल मार्शबद्दल माहिती दिली. त्यांनी म्हटले की, मिचेल मार्श बुधवारी सायंकाळी मायदेशी परतला आहे. वैयक्तिक कारणामुळे तो मायदेशी परतलाय. त्याची संघात परतण्याची वेळ निश्चित केली जाणार आहे. सध्या याविषयी अधिक माहिती दिली जाणार नाही.  

ग्लेन मॅक्सवेलला दुखापत – 

सोमवारी गोल्फ खेळत असताना ग्लेन मॅक्सवेल याला दुखापत झाली होती. कनकशनमुळे मॅक्सवेल याला काही दिवस आराम घेण्याचा सल्ला दिला आहे. ग्लेन मॅक्सवेल याने नेदरलँड्सविरोधात अवघ्या 40 चेंडूत शतक ठोकले होते. हे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक होय. अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात मॅक्सवेल उपलब्ध नाही, हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होय. सोमवारी गोल्फ खेळताना मॅक्सवेलला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून सावरण्यासाठी मॅक्सवेलल आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. दुखापत तितकी गंभीर नसल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. 

विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी – 

ऑस्ट्रेलियाची विश्वचषकात खराब सुरुवात झाली होती. चेन्नईच्या मैदानात पहिल्याच सामन्यात भारताकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 134 धावांनी पराभूत केले होते. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात करत कमबॅक केले. ऑस्ट्रेलियाने सलग चार सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तान, श्रीलंका, नेदरलँड्स आणि न्यूझीलंड यांचा पराभव करत गुणतालिकेत टॉप 4 मध्ये स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा आगामी सामना इंग्लंडविरोधात 4 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल उपलब्ध नाही. इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. त्यामुळे इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाची पार्टी खरा करु शकतो. अशा स्थितीत महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऑस्ट्रेलियापुढील अडचणी वाढल्या आहेत. 



[ad_2]

Related posts