India Vs Sri Lanka Indian Batters Have Missed Lots Of Hundreds In World Cup 2023 Rohit Sharma Shubman Gill Virat Kohli Shreyas Ayer Klrahul

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया अत्यंत दिमाखदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्येही टीम इंडियाने दमदार विजय मिळवत गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भले प्रथम क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असली तरी त्यांना एक पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र, टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत कोणताही पराभव स्वीकारलेला नाही. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा विजय खेचून आणत आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे. 

मात्र, या विजयाला हुकलेल्या शतकांची सुद्धा दु:खद किनार लाभली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टीम इंडियाच्या पाच टॉप फाईव्ह फलंदाजांची तब्बल आठ शतके हुकल्याने मोठी निराशा झाली आहे. यामध्ये सर्वात मोठी निराशा किंग कोहलीच्या सलग दोन आणि एकूण तीन हुकलेल्या शतकांमुळे झाली आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे टाॅप फाईव्ह फलंदाजांची आठ शतके हुकली आहेत. यामध्ये कोहलीच्या तीन शतकासह कॅप्टन रोहित शर्मा दोन, लोकेश राहुल एक, शुभमन गिल एक आणि श्रेयस अय्यरच्या एका शतकाचा समावेश आहे. 

किंग कोहली हा मास्टरबस्टर सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रमी 49 शतकांची बरोबरी करण्यासाठी त्याला अवघ्या  एक शतकाची गरज आहे. मात्र, सलग दुसऱ्यांदा त्याला हुलकावणी दिली आहे. विराट सलग दुसऱ्यांदा तो नर्व्हस 90 चा शिकार झाला. त्यामुळे चाहत्यांसह त्याची सुद्धा निराशा झाली आहे. आजच्या श्रीलंकेविरुद्धच्या  सामन्यामध्ये तो शतकाच्या उंबरठ्यावर मुंबईमध्येच शतकांच्या विक्रमांची बरोबरी करेल असं वाटत होतं. मात्र, तसं होऊ शकलं नाही. 

तसाच काहीसा प्रसंग सलामीवीर शुभमंग गिलच्या बाबती झाला. वर्ल्डकपच्या इतिहासातील पहिलेवहिलं शतक झळकवण्याच्या उंबरठ्यावरती असताना तो सुद्धा आज श्रीलंकेविरुद्ध 92 धावांवर बाद झाला.

गिल आणि कोहली नर्व्हस 90 चे शिकार झाल्यानंतर श्रेयसने सुद्धा दमदार खेळी केली गेल्या काही सामन्यांपासून त्याच्यावर सडकून टीका होत आहे. मात्र, त्यानं आज त्याच्या खेळीतून उत्तर दिलं अवघ्या 56 चेंडूत त्याने 82 धावांची खेळी करताना तीन चौकार आण सहा षटकार ठोकले. मात्र, तोही शतक झळकावू शकला नाही. त्यामुळे आज श्रीलंकेविरुद्ध तीन शतके हुकली गेली. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts