Virat Kohli Was Watching The Pakistan Vs New Zealand Match While Having The Haircut

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलकाता : देशाच्याच नव्हे, तर जागतिक क्रिकेटच्या अध्यायामध्ये दररोज विक्रमादित्य होत असलेल्या किंग विराट कोहलीचा आज (5 नोव्हेंबर) 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. दुसरीकडे भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज कोलकातामध्ये लढत होत आहे. त्यामुळे विराट कोहलीसाठी याच मैदानावरती मोठी कामगिरी करण्यास सुवर्णसंधी आहे. 

क्रिकेट हा भारतासाठी फक्त खेळ नसून तो एक धर्म समजला जातो. इथल्या कोट्यवधी भारतीय जनतेनं फक्त क्रिकेटपटूच नव्हे तर क्रिकेटशी निगडित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे चाहत्यांचा प्रेम नेहमीच ओसंडून वाहतं असतं. त्यामुळे क्रिकेटची मॅच कोठून कशी आणि कधी पाहिली जाईल याचं कोणतीही श्वाश्वती देता येत नाही. 

बर्थडेला नवीन लुक 

आता असाच एक प्रसंग सोशल मीडियात व्हायरल झाला असून किंग कोहली स्वतःच केस कटिंग करून घेत असताना काल अत्यंत रोमांचक झालेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा मोबाईलवर लाईव्ह पाहून आनंद घेताना दिसून आला. त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोहलीने बर्थडेला केस कटिंग करून आपला नवीन लुक करताना दिसून येत आहे. त्यामुळे जो सर्वसामान्यांसाठी क्रिकेटचा रोमांच पाहण्यात आनंद असतो तोच आनंद पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा आनंद विराट कोहलीने आपल्या मोबाईलवरून घेतला. 

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांची बरोबरी करण्याची सुवर्णसंधी विराट कोहलीसमोर आहे. त्याने आतापर्यंत 48 शतके झळकावली आहेत, तर 49व्या शतकासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा या वर्ल्डकपमध्ये करावी लागली आहे त्यामुळे भारतीय चाहतांचे नव्हे तर जगभरातील त्याच्या पाठीराख्यांची मनोकामना आज पूर्ण करणार का? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts