IND Vs SA LIVE Score, World Cup 2023 India Won The Toss And Decided To Bat First

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs SA LIVE Score, World Cup 2023: कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ सातव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. टेबल टॉपरमध्ये कोण बाजी मारणार.. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघात एक बदल करण्यात आलाय. आफ्रिकेने ईडन गार्डन मैदानावर तरबेज शम्सीला स्थान देण्यात आलेय. रोहित शर्माने संघात कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवलाय. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा ‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीवर असतील. कोहलीला सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करायची आहे. मात्र, आफ्रिकन संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँडविरुद्धचा एक सामना वगळता 6 सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियानं आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत. तसेच, वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे. 

टीम इंडियाची  प्लेईंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेचा  प्लेईंग-11
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यानसन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

भारत-दक्षिण आफ्रिकेचा हेड टू हेड रेकॉर्ड 
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं 3 आणि टीम इंडियानं 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी टीम इंडियानं 37 आणि दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले.

 

[ad_2]

Related posts