Virat Kohli Equals Tendulkars Record For Most ODI Centuries Sachin Tendulkar Reacts On Virat Kohlis Record-Equaling

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक केले होते. सचिन तेंडुलकरच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. सचिन तेंडुलकरने शतकाचे शतक केल्यानंतर मुकेश अंबानी यांनी खास पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत क्रिकेटमधील दिग्गजही आले होते. यावेळी सर्वांनीच सचिनचे तोंडभरुन कौतुक केले. याच कार्यक्रमात सचिनचे कौतुक करताना सलमान खान याने त्याला तुझा रेकॉर्ड कोण मोडेल असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर याने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची नावे घेतली होती. आता 11 वर्षानंतर विराट कोहलीने सचिनते ते शब्द खरे केले. 

सलामानचा काय प्रश्न ?

रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच असतात.. हा विक्रम लवकरच तुटावा असे म्हणत सलमान खान याने सचिन तेंडुलकर याला तुझा शतकाचा विक्रम कोण मोडेल असा प्रश्न विचारला होता. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणं अश्यक्य आहे, असेही सलमान खान म्हणाला होता. 

सचिन काय म्हणाला ?

विराट कोहली आणि रोहित शर्मा माझ्या शतकाचा विक्रम मोडतील, असे सचिन तेंडुलकरने भर कार्यक्रमात सांगितले. कुणी भारतीय खेळाडूने माझ्या शतकाचा विक्रम मोडला तर माझ्यासाठी अभिमानास्पद असेल, असेही सचिन म्हणाला. 

पाहा व्हिडीओ

विराट कोहली काय म्हणाला होता ?

मी आणि माझ्यासारखे अनेक तरुणांनी सचिन तेंडुलकरमुळे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सचिनसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणं आणि मैदानावर सोबत खेळणं माझ्यासाठी सर्वात मोठी आणि अभिमानस्पद गोष्ट होय, असे विराट कोहली म्हणाला होता. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विराट कोहलीला सचिनबद्दलचा प्रश्न विचारला होता.   

सचिनच्या शतकांच्या विक्रमाची विराटकडून बरोबरी

Virat Kohli equals Tendulkar’s record for most ODI centuries : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला फलंदाजीचा किंग विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात विराटनं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं आपलं 49वं शतक साजरं केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटनं 121  चेंडूंमधली नाबाद 101  धावांची ही खेळी दहा चौकारांनी सजवली. विराट कोहलीने शतक ठोकल्यानंतर सर्वच स्तरातून कौतुकाच वर्षाव होत आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर सोशल मीडियावर #GOAT𓃵 #ViratKohli #SachinTendulkar, 49th ODI हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. नेटकरी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. यामध्ये पत्नी अनुष्का शर्माचीही भर पडली. अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या शतकानंतर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

 

[ad_2]

Related posts