[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Zaka Ashraf on Babar Azam : बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला भारतात होत असलेल्या विश्वचषकात (Cricket World Cup 2023) शानदार कामगिरी करता आली नाही. गोलंदाजी, फिल्डिंग अन् फलंदाजीतही सातत्य राखता आले नाही. बाबर सेनेवर पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेटप्रेमींनी टीकेची झोड उडवली. त्यामुळे बाबर आझमचं कर्णधारपद जाणार, हे जवळपास निश्चित मानले जातेय. विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) खराब कामगिरीमुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला हटवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. पण बाबर आझमच्या कर्णधारपदाचा निर्णय कोण घेणार? बाबर आझमच्या कर्णधारपदावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जाका अश्रफ निर्णय घेणार का? यावर जाका अश्रफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, बाबर आझमच्या नेतृत्वाबाबत विश्लेषण आणि निर्णय घेण्याचे काम टेक्निकल कमिटीचे आहे. बाबर आझमचे कर्णधारपद राहणार की जाणार ? याचा निर्णय टेक्निकल कमिटी घेईल.
बाबर आझमच्या कर्णधारपदाचा निर्णय घेणे माझ्या अधिकारक्षेत्रात नाही – जाका अशरफ
बाबर आझमच्या कर्णधारपदाचा निर्णय घेणे माझ्या अधिकारक्षेत्रात नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन जाका अशरफ म्हणाले. मिसबाह उल हक याच्या नेतृत्वातील टेक्निकल कमिटी बाबर आझमच्या कर्णधारपदाचा निर्णय घेईल. याशिवाय मोहम्मद हाफिजही टेक्निकल कमिटीचा सदस्य आहे. ही कमिटी बाबरच्या नेतृत्वाबाबत रिपोर्ट देईल. त्यानंतर बाबर आझमच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेण्यात येईल.
टेक्निकल कमिटीच्या सल्ल्यानंतर बाबर आझमच्या कर्णधारपदाचा निर्णय घेतला जाईल, असे झका अश्रफ यांनी सांगितले. हे फक्त अध्यक्षांचे काम नाही. टेक्निकल कमिटीशिवाय माजी क्रिकेटपटूंनी दिलेल्या सल्ल्यानंतर बाबरच्या नेतृत्वाचा निर्णय घेतला जाणार, असेही ते म्हणाले.
बाबर आझमच्या नेतृत्वावर जाका अशरफ काय म्हणाले ?
जाका अशरफ यांनी बाबर आझमच्या नेतृत्वाचे तोंडभरुन कौतुक केले. जाका अशरफ म्हणाले की, बाबर आझम चांगला फलंदाज तर आहेच, त्याशिवाय तो शानदार कर्णधारही आहे. बाबर आझम विश्वचषक घेऊन पाकिस्तान येईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, भारतात होत असलेल्या विश्वचषकात पाकिस्तान आणि बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. बाबर आझमच्या कर्णधारपदावर पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे 4 सामन्यांत 8 गुण आहेत. या संघाने 4 सामने जिंकले आहेत. त्याशिवाय चार सामन्यात पराभवाचा सामना केला. पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले.
[ad_2]