[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
England Squad Against West Indies : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात इंग्लंड संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडला 9 सामन्यात फक्त तीन विजय मिळवता आले. साखळी फेरीतच इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड संघाच्या कामगिरीवर अनेक दिग्गजांनी टीका केली. विश्वचषकात साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर इंग्लंडच्या संघात मोठे बदल झाल्याचे दिसतेय. विश्वचषक खेळणाऱ्या नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलाय. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली. यामध्ये विश्वचषक खेळणाऱ्या नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. कर्णधारपद जोस बटलर याच्याकडेच कामय आहे.
इंग्लंड संघातून नऊ खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय. विकेटकीपर फलंदाज जॉनी बेयरस्टो, सलामी फलंदाज डेविड मलान, स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स, जो रूट यासारख्या
दिग्गज खेळाडूंना बेंचवरच बसवलेय. संघाचे नेतृत्व जोस बटलर याच्याकडे कायम आहे. विश्वचषकात खेळणाऱ्या सहा खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संधी दिली आहे. त्यामध्ये कर्णधार जोस बटलर, लियाम लिविंगस्टोन, गस एटकिंसन, ब्रेंडन कार्से आणि सॅम करन यांचा समावेश आहे.
3 डिसेंबरपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि विडिंज यांच्यातील तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे. त्यानंतर या दोन संघामध्ये पाच सामन्याची टी 20 मालिका होणार आहे. 12 डिसेंबरपासून इंग्लंड आणि विडिंज यांच्यामध्ये टी 20 मालिका होणार आहे. इंग्लंडविरोधात होणाऱ्या टी 20 आणि वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपल्या संघाची अद्याप घोषणा केलेली नाही.
वेस्ट इंडिजविरोधात इंग्लंडच्या वनडे संघात कोण कोणते खेळाडू ?
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गस एटकिंसन, हॅरी ब्रूक, ब्रेंडन कार्से, जॅक क्रॉली, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, ओली पोप, फिल साल्ट, जोश टंग आणि जॉन टर्नर.
वेस्ट इंडिजविरोधात टी 20 मालिकेसाठी इंग्लंडचे शिलेदार कोणते ?
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गस एटकिंसन, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल साल्ट, जोश टंग, रीस टॉप्ले, जॉन टर्नर आणि क्रिस वोक्स.
इंग्लंड- वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेचे वेळापत्रक –
3 डिसेंबर- पहिला वनडे (एंटीगुआ)
6 डिसेंबर- दूसरा वनडे (एंटीगुआ)
9 डिसेंबर- तिसरा वनडे (बारबाडोस)
इंग्लंड- वेस्ट इंडिज यांच्यातील टी 20 मालिकेचे वेळापत्रक –
12 डिसेंबर- पहिला टी20
14 डिसेंबर- दूसरा टी20
16 डिसेंबर- तिसरा टी20
19 डिसेंबर- चौथा टी20
21 डिसेंबर- पाचवा टी20
[ad_2]