IND vs NED, World Cup 2023 : नॉकआऊट सामन्याआधी भारताची पूर्वतयारी, आज नेदरलँड्सची भिडणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>विश्वचषकाच्या रणांगणात भारताचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँड्सशी होतोय. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतानं लागोपाठ आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान तर पटकावलंच, पण विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीटही कन्फर्म केलंय. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणारंय. पण त्या नॉकआऊट सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एका साखळी सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी विश्वचषकाच्या साखळीत याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या बलाढ्य संघांना हरवलंय, ते विसरता येणार नाही. त्यामुळं आठ सामन्यांमध्ये त्या दोन विजयांसह नेदरलँड्स गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. पण त्याच नेदरलँडविरुद्ध सामन्याचा आपल्या उणीवा दूर करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.</p>

[ad_2]

Related posts