Cyber Crime Quishing  Scam Beware Of Quishing Scam Here Is How To Protect Yourself From Qr Code Frauds

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Quishing  Scam : सध्या सगळीकडेच सायबर भामट्यांनी धुमाकूळ (Cyber Scam) घातला आहे. आपली एक चूक सायबर भामट्यांचे खिसे गरम करु शकतात शिवाय माहितीदेखील सायबर भामट्यांच्या हाती लागू शकते. त्यातच आता सगळीकडे आपण पेमेंट करताना किंवा मेन्यू निवडताना QR कोड वापरतो.  मात्र हाच QR कोड स्कॅन करणं आपल्यासाठी महागात पडू शकतं. QR कोड स्कॅन करणाऱ्यांना आता सायबर भामट्यांनी टार्गेट केलं आहे. यांना टार्गेट करुन Quishing   स्कॅम करताना दिसत आहे. क्विशिंग फ्रॉडमध्ये बनावट क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकांची वैयक्तिक माहिती चोरली जात आहे. त्यामुळे यापुढे QR कोड स्कॅन करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. 

कसा केला जातो  Quishing  स्कॅम?

स्कॅमर्स हे क्यूआर कोड कुठेही ठेवू शकतात. जर आपण एखाद्या वेबसाइट, जाहिराती इत्यादींवर क्लिक केले तर ते आपल्याला थेट दुसऱ्या वेबसाइटवर घेऊन जातात आणि त्या वेबसाईटवरील माहिती भरायला सांगतात. पर्सनल डिटेल्स टाकल्यानंतर स्कॅमर्स त्याद्वारे पुन्हा लोकांना टार्गेट करतात.  यानंतर तुम्हाला फ्रॉड कॉल्स, स्कॅमशी संबंधित मेसेज ेस वगैरे येऊ लागतील. त्यामुळे नेहमी सोशल मीडिया वापरताना एखादा क्यूआर कोड दिसला तर तो स्कॅन न करता आधी त्याची माहिती घ्या. जर तुम्हाला काही तरी गडबड वाटत असेल तर ताबडतोब अशा वेबसाईटमधून बाहेर पडा. नाहीतर खासगी माहिती आणि आयुष्यभराची पुंजी गेलीच म्हणून समजा.

स्वत:ची सुरक्षा कशी कराल?

-क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी, वेबसाइटची माहिती घ्या.
-वेबसाईट सुरक्षित वाटत नसेल तर त्यात कोणतीही माहिती भरु नका.
-हे फ्रॉड टाळण्यासाठी तुम्ही बिल्ट-इन सिक्युरिटीसह येणारे क्यूआर कोड स्कॅनर अॅप डाऊनलोड करू शकता. 
-असे अ ॅप्स तुम्हाला आधीच हानिकारक आणि चुकीच्या कोडची माहिती देतात.  म्हणजे ते तुम्हाला घोटाळ्यांपासून वाचवू शकतात.
-आपला स्मार्टफोन नेहमी अपडेटेड ठेवा आणि त्यात अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा. 
-कोणत्याही परिस्थितीत आपली खासगी माहिती कुठेही उघड करणार नाही आणि आपल्या डिजिटल अकाऊंटचा पासवर्ड कोणालाही शेअर करणार नाही याची विशेष काळजी घ्या.
– सतत पासवर्ड बदलत रहा.

इतर महत्वाची बातमी-

Ayodhya Ram Mandir Scam : रामभक्त आता सायबर भामट्याचं टार्गेट? राम मंदिराच्या नावाने मोठा Cyber Scam समोर; चुकूनही करु नका ‘हे’ काम
Whatapp Update : दोन नंबरसाठी दोन whatsapp अॅपची गरज नाही; एकाच अॅपमध्ये वापरा दोन नंबर, कसं? ते पाहाच!

 

 

 

[ad_2]

Related posts