रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात Ayodhya Ram Mandir ramlalla today in the new temple area tomorrow in the anctum sanctorum

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir News in Marathi : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राममंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी 8000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर भव्य शैलीत सजवण्यात येणार आहे. दरम्यान आजपासून (17 जानेवारी 2024) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज नव्या मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल, तर उद्या (18 जानेवारी 2024) मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.  

अयोध्येत आज ऐतिहासिक दिवस असून रामलल्लांच्या मूर्तीचं अयोध्येतल्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे. मूर्तिकार अरुण योगीराज यांनी ही रामाची मूर्ती साकारलीय. ज्याची प्रतिक्षा रामभक्तांना कित्येक वर्षांपासून होती तो दिवस आज उगवलाय. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल. तर उद्या मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. तसेच  श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीमुळे 20 आणि 21 जानेवारीला रामलल्लाचे दर्शन बंद राहणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्व नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे. सर्व जलकुंभ अयोध्येत पोहोचले आहेत. मंदिराच्या गाभार्‍यात तीन मूर्ती ठेवण्‍याची तयारी केली होती. त्यापैकी कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांच्या शिल्पाची निवड करण्यात आली. राम मंदिराचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतंय.

दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुष्ठान सुरु झाले असून  ते अभिषेक समारंभापर्यंत सुरु राहणार आहे. अकरा पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करुन विधी करत असल्याचे राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले. अंतिम अभिषेक होईपर्यंत सर्व विधी यजमानपद ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी उषा मिश्रा यांच्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारे विधी मिश्रा दाम्पत्यांच्या हस्ते होणार आहे. 

सर्व आखाड्यांचे संत राहणार उपस्थित 

श्री रामजन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील सर्व आखाड्यांचे संत, सर्व संप्रदायचे आचार्य, संत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्री महंत, महंत, नागा साधू, आदिवासी, गिरीवास तटवासी, बेट आदिवासी उपस्थित राहणार आहेत. शैव, वैष्णव, शाक्त, गणपत्य, पत्य, शीख, बौद्ध, जैन, दशनम शंकर रामानंद्र, रामानुज, निंबार्क, माधव, विष्णु नामी, रामसनेही, घिसा पंथ, गरीबदासी, गौडीया, कबीरपण वाल्मिकी, आसाममधील शंकरदेव, माधव देव, इस्काकॉन. रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रम – गायत्री परिवार, अनुकुल चंद, ठाकूर परंपरा, ओरिसातील महिमा समाज, पंजाबमधील अकाली, निरंकारी, नाम राधास्वामी आणि स्वामीनारायण, वारकरी, वीर शैव उपस्थित राहणार आहेत.

  

Related posts