Icc Cricket World Cup 2023 New Zealand Became The 4th Team To Qualify For Semi Final After India South Africa And Australia

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC Cricket World Cup 2023 : भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये आज विश्वचषकातील अखेरचा साखळी सामना सुरु आहे. यंदाच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिाक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार संघाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सेमीफायनल होणार आहे. यामधील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार भिडणार आहे. पुढील आठवड्यात सेमीफायनलच्या लढती होणार आहे. त्याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात….

पहिल्या सेमीफायनलसंदर्भात सर्व माहिती –  

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. 

2019 मध्ये याच दोन संघामध्ये सेमीफायनलचा सामना रंगला होता. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याची परतफेड करण्यासाठी टीम इंडिया उतरेल. 

15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.  

स्टार स्पोर्ट्सवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात.

मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. 

सेमीफायनलसंदर्भात सर्व माहिती –  

विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार आहे. 

कोलकात्याच्या ईडन गार्ड्न मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. 

16 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या दोन संघामध्ये लढत होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. 

स्टार स्पोर्ट्सवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात.

मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल.  

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमध्ये पाऊस आला तर ?

आयसीसीने दोन्ही सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात पावसाने खोडा घातला, तर सामना राखीव दिवशी म्हणजेच 16 तारखेला होईल. जर 16 तारखेलाही सामना झाला नाही.. तर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या संघाला विजयी घोषीत करण्यात येईल. 

गुणतालिकेत भारतीय संघ 16 गुणांसह आघाडीवर आहे. भारतीय संघाचा आज अखेरचा सामना आहे. हा सामनाही जिंकला तर भारताकडे 18 गुण होतील. भारतीय संघ गुणतालिकेत नंबर 1 स्थानावरच राहणार आहे. त्यामुळे सेमीफायनलचा सामना पावसामुळे झाला नाही तर भारतीय संघाला फायनलचं तिकिट मिळणार आहे. 

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यात पाऊस आला तर ?

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. या सामन्यासाठीही आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. 16 तारखेला पावसाने हजेरी लावली तर सामना 17 तारखेला खेळवण्यात येईल. पण 17 तारखेलाही पावसामुळे सामना झाला नाही तर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या संघाला फायनलचं तिकिट मिळणार आहे. 
 
दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांचे 14 – 14 गुण आहेत. पण आफ्रिकेचा रनरेट चांगला असल्यामुले ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर दुसरा सेमीफायनल सामना राखीव दिवशीही झाला नाही, तर दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलचे तिकिट मिळेल. 

[ad_2]

Related posts