India Vs Netherlands Shreyas Iyer Scored His Maiden World Cup Century And In Style

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळूर : वर्ल्डकपमध्ये सुरुवातीला शाॅर्ट बाॅलवरून सडकून टीका झालेला टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. दिवाळीच्या खास मुहूर्तावर त्याने नेदरलँडविरुद्ध दमदार फलंदाजी करत 84 चेंडूत शतक झळकावले. त्याच्याआधी शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतके पूर्ण केली. कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात आलेला अय्यर सुरुवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. विराट कोहलीच्या आयपीएलच्या घरच्या मैदानावर अय्यरने बॅटने जोरदार फटाके उडवत या विश्वचषकात शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या विशेष यादीत आपले नाव नोंदवले.

श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर केएल राहुल यांनी अशी नाबाद भागीदारी केली ज्याला नेदरलँड्सच्या गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. दोन्ही शतकवीरांनी चौथ्या विकेटसाठी 208 (128 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान श्रेयस अय्यर 94 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 128 धावा करून नाबाद परतला. तर केएल राहुलने 64 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या.

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील विश्वचषक 2023 चा शेवटचा साखळी सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या आणि नेदरलँड्ससमोर 411 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांना चोप दिला. भारतासाठी श्रेयस अय्यरने चौथे एकदिवसीय शतक झळकावले आणि 94 चेंडूत 128 धावा केल्या. याशिवाय रोहित शर्माने 61 धावा, शुभमन गिलने 51 धावा आणि विराट कोहलीनेही तेवढ्याच धावा केल्या.

विराट कोहली दिवाळीच्या मुहूर्तावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण 51 धावा करून तो बाद झाला. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ कोणताही बदल न करता या सामन्यात दाखल झाला आहे. एकीकडे टीम इंडियाने  या स्पर्धेतील एकही सामना गमावला नसून उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले आहे. भारत 8 विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हा सामना जिंकणे नेदरलँडसाठी खूप महत्त्वाचे आहे.

या सामन्याच्या तिसऱ्याच षटकात रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 14000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्यांच्या आधी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी भारतासाठी हा पराक्रम केला होता. या सामन्यात रोहित शर्माने 12 धावा करत ही कामगिरी केली. दोन्ही सलामीचे फलंदाज वेगवान फलंदाजी करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts