Aadhaar Card Biometric How To Lock Aadhaar Card Biometric Simple Steps Via Maadhaar And Uidai Portal

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aadhaar Card Biometric : आधारकार्ड (Aadhaar Card Biometric)नंबर सध्या सगळीकडे कामात येतं. त्यामुळे आपला आधारकार्ड नंबर कोणालाही सांगू नका. फोनवरुन कोणी विचारला तर सांगू नका, असं सांगितलं जातं. कारण तुमचा आधारनंबर वापरुन फ्रॉड होऊ शकतो. आपले फिंगरप्रिंट्स अटॅच केलेले असतात. सध्या सायबर भामटे कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैसे मिळवण्याच्या तयारीत असतात. त्यात त्यांच्या हाती जर आपला आधारकार्ड नंबर लागला तर खिसा रिकामा व्हायला वेळ लागत नाही. जर तुमचं आधारकार्ड वापरुन कोणी फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही आधी बॉयोमेट्रिक लॉक करायला हवं. ते कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

आधार कार्डचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन कसे ब्लॉक करावे?

-सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जा किंवा थेट https://resident.uidai.gov.in/bio-lock टॅप करा.
-त्यानंतर माझ्या आधारवर टॅब करा. त्यानंतर खाली असणाऱ्या आधार सेवेवर टॅप करा.
-यानंतर आधारAadhaar lokc/unlock चा पर्याय निवडावा लागेल.
-यानंतर तुम्हाला आधार नंबर किंवा VID टाकावा लागेल.
-त्यानंतर CAPTCHA  आणि ओटीपी पाठवावा लागतो.
-यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
-5 अंकी OTP टाकल्यानंतर इनेबल ऑप्शनवर टॅप करा.
-यानंतर तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक होईल.

बायोमेट्रिक ला mAadhaarने लॉक कसे करावे?

-सर्वप्रथम mAadhaar अॅप डाऊनलोड करा.
-यानंतर आधार क्रमांकाची नोंदणी करा.
-त्यानंतर OTP आणि नंतर 4 अंकी PIN टाका.
-त्यानंतर आधार प्रोफाईल अॅक्सेस करा.
-स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
-त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि लॉक बायोमेट्रिक्सवर टॅप करा.
-यानंतर बायोमेट्रिक लॉकसाठी 4 अंकी पिन टाका.

आधार कार्ड अपडेट करा अन् फसवणूक टाळा !

फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक अपडेटकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यूआयडीएआयने दर 10 वर्षांनी आधार कार्डची माहिती अपडेट करणं बंधनकारक केलं आहे. आपली माहिती अचूक आणि अपडेट आहे याची खात्री करणं देखील आवश्यक आहे. आधार फ्रॉड टाळण्यासाठी अपडेट्स देखील आवश्यक आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्यास पत्ताही बदलावा लागतो. त्यामुळे 14 तारखेच्या आत तुमचं आधार अपडेट करुन घ्या.
यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही ही माहिती अपडेट करू शकता. सततच्या अपडेटमुळे आधार हा विश्वासार्ह स्त्रोत बनतो. यामुळे तुम्हाला खूप मदत ही होते. त्यामुळेच लोक ते वेळोवेळी अपडेट ही करतात. सध्या फ्री अपडेटची तारीखही 14 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

इतर महत्वाची बातमी-

Tata Motors : व्यावसायिकांची चिंता मिटली! टाटा मोटर्सकडून नवीन Intra V70 pickup, Intra V20 Gold pickup ,Ace HT+ लाँच

 

 

[ad_2]

Related posts