How To Get Free Gmail Storage Follow These Steps Online Tips And Tricks

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Free Gmail Storage : जर तुम्ही जीमेल युजर (Gmail) असाल तर तुम्हाला जीमेल स्टोरेज फुल्ल असा मेसेज अनेकदा आलाच असेल. जीमेलमध्ये स्टोरेज नसल्यानं अनेकदा महत्वाचा डेटा बॅकअप होत नाही.  जीमेल फुल्ल असेल तर नवीन मेल मिळत नाही. त्यामुळे अनेकदा महत्वाचे मेल्स न आल्याने मोठी किंमत मोजावी लागू शकते. मात्र आम्ही आज जीमेल स्टोरेज कसं वाढवायचं, हे सांगणार आहोत. 

तुम्ही  दोन प्रकारे वाढवू शकता स्टोरेज…

जीमेल स्टोरेज मोफत कसे वाढवायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे दोन मार्ग आहेत.  ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 30 सेकंदात 10 एमबी फाइल सिलेक्ट करून स्टोरेज वाढवू शकता.

स्टोरेज वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा…

-सर्वप्रथम तुमचे जीमेल अकाऊंट उघडा.
-यानंतर टॉपमध्ये सर्च ऑप्शनवर जा.
-यानंतर टाईप करून सर्च करा has:attachment larger:10MB
-यानंतर 10MB पेक्षा जास्त स्टोरेज असलेले मेल तुमच्यासमोर येतील.
-तर 10MBपेक्षा जास्त स्टोरेज असलेले  अनावश्यक मेल डिलीट करू शकता.
-यानंतर तुमचे जीमेल स्टोरेज रिकामे होईल. 

किंवा तुम्ही दुसऱ्या टिप्सदेखील फॉलो करु शकता…

-सर्वप्रथम गुगल सर्च बारमध्ये जा.
-मग drive.google.com/#quota टाईप करा.
-मग तुम्हाला मोठे स्टोरेज असणारे मेल दिसेल.
-यानंतर तुम्ही ती फाइल डिलीट करू शकाल.
-तेव्हा तुमचे जीमेल अकाऊंट रिकामे होईल.

जीमेल सब्सक्रिप्शन किंमत

जीमेल स्टोरेज फुल हे टाळण्यासाठी जीमेल युजर्स सहसा सब्सक्रिप्शन घेतात. अशा मासिक सब्सक्रिप्शनमध्ये 130 रुपयांत तीन महिन्यांसाठी 100GB स्टोरेज दिले जाते. दरमहा 210 रुपयांत 200 GB स्टोरेज आणि 2 टीबीTB स्टोरेजसाठी 650 रुपये दरमहा मिळू शकतात.

मोबाइल अॅपमध्ये नवं फिचर

गुगलने काही दिवसांपूर्वी जीमेल युजर्ससाठी मोबाइल अॅपवर सिलेक्ट ऑल ऑल हा पर्याय दिला  आहे. याच्या मदतीने तुम्ही एकावेळी 50 मेल सिलेक्ट आणि डिलीट करू शकता. यापूर्वी युजर्स एका वेळी एकच मेल डिलीट करू शकत होते. याशिवाय कंपनीने युजर्सना मेल ट्रान्सलेशनसह इतर फीचर्सही दिले आहेत. या फिचर मुळे मेल डिलीट करणं सोपं झालं आहे. त्यामुळे आता तुम्ही थेट 50 मेल सिलेक्ट करुन डिलीट करु शकणार आहात. दरवेळी आपण मोबाईल स्टोरेज फुल्ल झालं म्हणून तक्रार करत असतो. नव्या फिचरमुळे आणि नव्या ट्रिकमुळे आता स्टोरेजची चिंता कमी होणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Facebook Instagram Privacy:  इन्स्टाग्राम, फेसबुकची तुमच्या फोनवर करडी नजर; आताच Privacy Setting करुन घ्या, नाहीतर ….

 

[ad_2]

Related posts