Shreyanka Patil Make Her ODI Debut In Mumbai Impressive Performance In Her Debut T20I Series

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shreyanka Patil ODI Debut INDW vs AUSW : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना मुंबईत होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने श्रेयंका पाटीलला (Shreyanka Patil) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. श्रेयंका कारकिर्दीतील पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

श्रेयंकाने यावर्षी टीम इंडियासाठी टी-20 पदार्पण केले

टीम इंडियाने दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. टीम इंडियाने श्रेयंका पाटीलला पदार्पणाची संधी दिली आहे. कर्नाटकच्या श्रेयंकाचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. ती महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळते. यासोबतच गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडूनही खेळली आहे. श्रेयंकाने यावर्षी टीम इंडियासाठी टी-20 पदार्पण केले. डिसेंबर 2023 मध्ये श्रेयंकाने इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 खेळला. तिने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यात 5 बळी घेतले आहेत. श्रेयंका भारत अ संघाकडून खेळली आहे. इंग्लंड अ संघाविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत 5 बळी घेतले होते.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेकीनंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  हरमनप्रीत म्हणाली की, आम्ही नाणेफेक जिंकली असती तरी आम्ही प्रथम गोलंदाजी निवडली असती. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सध्या गोलंदाजीसाठी योग्य आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करू, असे ऑस्ट्रेलियन कर्णधार हिलीने सांगितले. खेळपट्टी बऱ्यापैकी कोरडी दिसते. आम्ही चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला संघ : स्मृती मानधना, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.

ऑस्ट्रेलिया महिला संघ : अ‍ॅलिसा हिली (wk/c), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts