Virat Kohli And Rohit Sharma Played There Sixth Icc Final Surpassed Ms Dhoni

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs AUS WTC Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये जागतिक कसोटी विजेतेपदासाठी चुरस सुरु झाली आहे.  दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगली आहे. या अगोदर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून भारत इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. पण या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आयसीसीच्या सहा फायनल सामन्यात खेळले आहेत.  सर्वाधिक फायनल खेळणाऱ्या खेळाडूमध्ये विराट-रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहेत. युवराज सिंह पहिल्या स्थानावर आहे. 

टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धांच्या 11 फायनल खेळल्या आहेत. या 11 फायनलपैकी माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग चक्क 7 फायनल खेळला आहे. तर विराट कोहली व रोहित शर्मा प्रत्येकी 6 फायनल खेळले आहेत. जगातील फक्त युवराज सिंग, कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांनीच सात वेळा आयसीसीच्या स्पर्धांची फायनल खेळली आहे. पॉंटिंग, रोहित व विराटच्या नावावर आता प्रत्येकी सहा फायनल सामने खेळण्याचा विक्रम जमा झाला आहे. भारताचा माजी कर्णधार धोनी याने आपल्या करिअरमध्ये पाच फायनल खेळल्या आहेत. यामध्ये तीन फायनलमध्ये कर्णधार म्हणून विजयी झालाय.  

भारतीय संघाने आजपर्यंत आयसीसीच्या स्पर्धांच्या 11 फायनल खेळल्या आहेत.  आयसीसी विश्वचषक, आयसीसी टी 20 विश्वचषक, आयसीसी वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा समावेश आहे. 1983, 2003 आणि 2011 असे तीन वडने विश्वचषक फायनल भारताने खेळली आहे.  2000, 2001, 2013 आणि 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल खेळली आहे. 2007 आणि 2014 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकाची फायनल भारताने खेळली आहे.  2021 आणि 2023 मध्ये  कसोटी चॅम्पियनशीप फायनल भारताने खेळली आहे. 

ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना ओव्हलवर श्रद्धांजली, भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात! 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर थरार रंगला आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कोण पटकावणार ? याकडे जगातील सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. ओव्हल मैदानावर नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या बाजूने पडला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओव्हल मैदानावर ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना  श्रद्धांजली अर्पण केली. एक मिनिटांचे मौन पाळत दोन्ही संघातील खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली. दोन्ही संघातील खेळाडू मैदानात दंडावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय एक हजार पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. भारतात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात होय.  

[ad_2]

Related posts