World Brain Tumor Day Myths And Reality About Brain Tumor; ब्रेन ट्यूमरशी संबंधित गैरसमजुती आणि वास्तविकता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेंदूच्या गाठीची कमतरता

मेंदूच्या गाठीची कमतरता

गैरसमज – मेंदूची गाठ ही मेंदूचा कर्करोग दर्शवतो. हा एक गैरसमज असून वास्तविक पाहता ब्रेन ट्यूमरचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यातील एक म्हणजे सौम्य (कर्करोग नसलेले) आणि दुसरा आहे घातक (कर्करोग).
वास्तविकता – काही घातक ब्रेन ट्यूमर मेंदूच्या पेशी नष्ट करू शकतात आणि आसपासच्या ऊतींवर परीणाम करतात.

सर्वच ब्रेन ट्यूमर घातक

सर्वच ब्रेन ट्यूमर घातक

गैरसमज – सर्वच ब्रेन ट्यूमर घातक असतात हा देखील एक गैरसमज पसरला असून खरे तर सर्व ब्रेन ट्यूमर घातक नसतात.

वास्तविकता – काही ट्यूमर सौम्य असतात, म्हणजे ते इतर अवयवांमध्ये पसरत नाहीत किंवा आसपासच्या पेशी किंवा ऊतींना हानी देखील पोहोचवत नाहीत परंतु इतर ट्युमर घातक असू शकतात. ब्रेन ट्युमरचे वर्गीकरण केले जाते आणि पेशींच्या प्रकारानुसार ते सौम्य किंवा घातक आहे हे ठरविले जाते.

(वाचा – जिने चढण्याचे ५ फायदे, कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून पोटाची चरबी कमी करण्यापर्यंत उत्तम पर्याय)

सर्व रूग्णांमध्ये समान लक्षणे

सर्व रूग्णांमध्ये समान लक्षणे

गैरसमज – ब्रेन ट्यूमर असलेल्या सर्व रुग्णांमध्ये समान चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात हा एक गैरसमज असून ब्रेन ट्यूमरचे निदान झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात आणि त्यानुसार विविध चाचण्यांद्वारे निदान केले जाते.

वास्तविकता – काही लोकांमध्ये ट्यूमरची लक्षणे नसताना, इतरांना लक्षणे दिसू शकतात जी कालांतराने वाढतात आणि त्यामुळे निदानास उशीर होतो. काहींना सारखी चक्कर येते तसेच अशा रुग्णांमध्ये बऱ्याचदा कर्करोगाचे निदान होते.

(वाचा – सतत लघ्वीला होत असेल तर ७ गंभीर आजारांचे आहेत हे संकेत, दुर्लक्ष करणे जीवावर बेतेल)

तरूणांना ब्रेन ट्यूमर होत नाही

तरूणांना ब्रेन ट्यूमर होत नाही

गैरसमज – तरुणांना ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता नसते हा एक गैरसमज समाजामध्ये पहायला मिळतो. मात्र ब्रेन ट्यूमर हा कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो.

वास्तविकता – ब्रेन ट्यूमरचा नवजात मुलांवरही परिणाम होऊ शकतो. तथापि, मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये असलेले ब्रेन ट्यूमर सारखे नसतात. त्यांच्यामध्ये वैविध्यपूर्ण उत्पत्ती आणि पेशींचा समावेश असू शकतो. भारतात मुलांमध्ये दुसरा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग हा ब्रेन ट्यूमर आहे.

(वाचा – Fertility साठी पुरुषांच्या शस्त्रक्रिया उपयोगी ठरतात का? तज्ज्ञ काय देतात सल्ला)

सेल फोनमुळे होतो ब्रेन ट्यूमर

सेल फोनमुळे होतो ब्रेन ट्यूमर

गैरसमज – सेल फोनच्या वापरामुळे ब्रेन ट्यूमर होतो हा देखील एक गैरसमज आहे. फोन वापरणे आणि ब्रेन ट्यूमर यांच्यात संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.

वास्तविकता – मोबाईल फोनद्वारे नॉन-आयनीकरण रेडिओफ्रिक्वेंसी लहरी बाहेर पडतात. मेंदू किंवा डीएनएला हानी पोहोचवण्यासाठी हे पुरेसे सामर्थ्यवान नाहीत. शिवाय, या लहरींची वारंवारता कमी असते आणि ते कवटी किंवा मेंदूमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

निष्कर्ष

निष्कर्ष

थोडक्यात, ब्रेन ट्यूमर ही एक प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे, तरीही त्यांच्याबद्दल असंख्य समज आणि गैरसमज पसरले आहेत ज्यामुळे चिंता आणि भिती निर्माण होऊ शकते.

ब्रेन ट्यूमरबद्दलची लक्षणे समजून घेणे आणि तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला या स्थितीची कोणतीही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. नियमित तपासणी, वेळीच निदान आणि उपचार यामुळे कर्करोगावर मात करता येऊ शकते.

[ad_2]

Related posts