( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sun And Jupiter Conjunction in Aries: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ज्ञान, संपत्ती, संतती, धर्म आणि दान यासाठी जबाबदार कारक गुरु सध्या मेष राशीत आहे. यंदाच्या वर्षात एप्रिलमध्ये सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य मेष राशीत महिनाभर राहणार आहे.
सूर्य आदर, ऊर्जा, यश, नोकरी आणि शक्तीचा कारक मानला जातो. 14 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य आणि मेष राशीत देवांचा गुरू गुरूचा संयोग होईल. या दोन मोठ्या ग्रहांची ही भेट सर्व राशींवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुभ परिणाम दिसून येणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांवर ग्रहांच्या या संयोगाचा शुभ प्रभाव पडणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. पदोन्नती मिळू शकते. तुमच्या उत्पन्नाच्या माध्यमांमध्ये वाढ होऊ शकते. स्टॉक मार्केट आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवू शकता.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. करिअरशी संबंधित बातम्या मिळतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा कमावण्याची संधी मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांना सूर्य आणि गुरूच्या युतीचा फायदा होणार आहे. जोडीदार तुमच्या जीवनात प्रवेश करू शकतो. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसाय आणि करिअरमध्ये फायदा होईल. पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांवर या संयोगाचा शुभ प्रभाव राहणार आहे. या काळात पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रगतीचे दरवाजे उघडणार आहेत. हा काळ व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनासाठी अनुकूल असेल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )