Ind Vs Afg T20i Team India Probable Playing 11 Vs Afghanistan 1st T20 Rohit Sharma Yashasvi Jaiswal Open

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Afghanistan 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vd AFG) यांच्यामध्ये गुरुवारपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील (IND vs SA) मोठ्या दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात टी 20 मालिका खेळणार आहे. आगामी टी 20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) पार्श्वभूमिवर ही मालिका महत्वाची ठरणार आहे. 11 जानेवारी रोजी मोहालीमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील थरार होणार आहे. वर्षभरानंतर टीम इंडियात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली याचं कमबॅक झालेय. त्यामुळे प्लेईंग 11 मधील या दोघांचे स्थान निश्चित मानले जातेय. रोहित शर्मा सलामीला उतरेल तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली धुरा संभाळेल. पण रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार? शुभमन गिल की यशस्वी जायस्वाल प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. 

गिल, संजूला संधी मिळण्याची शक्यता कमीच –

मोहाली येथे होत असलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शुभमन गिल याला बेंचवरच बसावं लागू शकतं. दुसरीकडे विकिटकिपिंगची जबाबदारी जितेश शर्मा याच्यावर असण्याची शक्यता आहे. जितेश शर्मा फिनिशिंग करण्यात तरबेज आहे, त्यामुळे जितेशला संधी मिळेल, असा अंदाज वर्तवला जातोय. 

रोहित आणि यशस्वी डावाची सुरुवात करणार ?

अफगानिस्तानविरोधात पहिल्या टी 20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग कोहली जबाबदारी संभाळेल. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा तर पाचव्या क्रमांकावर रिंकूचं खेळणं निश्चित मानलं जातेय. सहाव्या स्थानावर जितेश शर्मा खेळण्याची शक्यता आहे. फिरकी अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल दिसेल. त्याच्या जोडीला कुलदीप यादव अथवा रवि बिश्नोई यांच्यातील एक गोलंदाज दिसेल. तर वेगवान गोलंदाजीत अर्शदीप, आवेश आणि मुकेश कुमार खेळण्याची शक्यता आहे. 

अफगानिस्तानविरोधात पहिल्या टी 20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11 – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्वोई/कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.

अफगानिस्तान टी20 मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.

[ad_2]

Related posts