The Cricket Catch Went Viral On Social Media Is From Australia Big Bash League One Of The Greatest Fielding Efforts In Cricket History

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Best Catch Of Cricket History : क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक शानदार झेल पाहिले असतील. पण एक झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कॅच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील आहे. हा झेल पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वोत्तम झेल असल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे. हा झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

या व्हिडिओमध्ये फलंदाजाने लाँग ऑफवरून शॉट मारल्यानंतर वर्तुळाजवळ उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे वेगाने धावत असतो. हा क्षेत्ररक्षक सीमेजवळ धावत जात सीमारेषेनजीक अफलातून झेल घेतला. मात्र, चेंडू त्याच्या हातात राहिला असता, तर तो सिक्स होऊ शकला असता. मात्र, त्याने टायमिंग अत्यंत अचुक वापर करताना सीमारेषेवर डाय मारताच चेंडू आत फेकला आणि जवळच उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल सहज घेतला. 

फील्डरने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेल…

या आश्चर्यकारक झेलनंतर फलंदाजासह चाहत्यांना धक्काच बसला. काही चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण खूप अवघड वाटणारा झेल क्षेत्ररक्षकाने आधीच घेतला होता. अशाप्रकारे फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पण क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने मागे धावत झेल पकडला त्यावर फलंदाजासह चाहत्यांना विश्वास बसणे सोपे नव्हते. सोशल मीडियावरील चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आजपर्यंत असा झेल पाहिला नाही. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात आश्चर्यकारक झेल आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts