India Vs Afghanistan T20 Virat Kohli Return May Cut Shubman Gill Chance In India Vs Afghanistan 2nd T20 In Indore

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Afghanistan T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. आता दुसरा सामना उद्या म्हणजेच रविवारी 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. या सामन्यात किंग विराट कोहलीचे पुनरागमन जवळपास निश्चित आहे. पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे कोहलीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. आता दुसऱ्या टी-20मध्ये कोहलीच्या पुनरागमनामुळे शुभमन गिलचा पत्ता कट होऊ शकतो.  

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते हे जाणून घेऊया.

गिलला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाणार?

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये शुभमन गिल काही खास करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना गिलने 12 चेंडूत 23 धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर गिलचे कार्ड दुसऱ्या टी-20 च्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं जाऊ शकते. मात्र, गिलच्या जागी यशस्वी जैस्वालचा सलामीवीर म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो. अशा प्रकारे रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांची भारताची सर्वोच्च फळी बनू शकते. मात्र, मधल्या फळीत बदलाची आशा कमी आहे.

गोलंदाजीतही बदल होऊ शकतात

गोलंदाजीतही बदल होऊ शकतात. स्टार फिरकीपटू रवी बिश्नोई पहिल्या टी-20मध्ये चांगलाच महागडा ठरला. बिश्नोईने 3 षटकात 35 धावा दिल्या होत्या आणि त्याला यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत बिश्नोईच्या जागी कुलदीप यादव दुसऱ्या टी-20 मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो.

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts